tag:blogger.com,1999:blog-37339332.post4751412982874226418..comments2024-02-23T14:12:36.226+05:30Comments on ashishchandorkar: दिवस ‘सांज समाचार’चेashishchandorkarhttp://www.blogger.com/profile/02646453807469764288noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-37339332.post-78121162996863759332018-08-04T14:41:10.320+05:302018-08-04T14:41:10.320+05:30आशिष चांदोरकर, नमस्कार
सुरेश जोशी गेल्याचे म. टा. ...आशिष चांदोरकर, नमस्कार
सुरेश जोशी गेल्याचे म. टा. वरून कळले. तुझ्या ब्लॉग मधील लेखा मुळे तुझी पत्रकारितेचे सुरुवात जोशी यांच्या ‘सांज समाचार’ पासून झाली हे कळले. त्यांच्या सायंदैनिकाच्या उभारणीला माझा किंचित हातभार लागला होता. त्याची आठवण झाली. सांज समाचार ते नंतर जेथे छापायचे त्या प्रेस मध्ये बिले, पावत्या, आदी छापणे हा त्यांचा मूळ व्यवसाय. प्रभात चित्रपटगृहा समोर एका ट्रेडलवर ते छापत.
त्या आधी शिंदे आळीत श्री. पद्माकर डोणजेकर यांनी ‘पुणे समाचार’ नावाचे सांज दैनिक काढायचा घाट घातला होता. त्यांना वर्तमानपत्राचा काहीही अनुभव नव्हता. माझी त्यांची ओळख झाली तेव्हा मी श्री अब्दुल हमीद खान या पत्रकार मित्राची गाठ घालून दिली. आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठात श्री खान उपसंपादक होते. अत्रे यांच्या पश्चात मराठा बंद पडल्यामुळे खान मुंबई सोडून पुण्याला नोकरीच्या शोधात आले होते.
श्री. डोणजेकर यांच्या घरी मजकूर लिहून जोशी यांच्या प्रेस वर छापायला घेऊन जावे असा दिनक्रम ठरला. मी त्यावेळी UNI मध्ये बातमीदार होतो. वेळ असेल तेव्हा खान यांना मदत करत असे. श्री जोशी यांना प्रेसच्या धंद्याचा अनुभव होताच. अंक विक्री आणि पैशाची वसूली यात ही त्यांनी हळूहळू जम बसविला.
दैनिक संध्या, सांज केसरी आणि दैनिक सकाळ चे दुपार चे दैनिक असे प्रयोग या व्यवसायात चालू होते. मातब्बर संस्थांचे व्यवसाय बंद पडत होते. पण जोशी यांनी नेटाने काम चालू ठेवले. पत्रकारिता देखील शिकून घेतली. श्री. डोणजेकर थकले. पुणे समाचार बंद पडला. खान पुन: बेकार झाले.
पण तोपर्यंत जोशी यांनी आपले सांज समाचार जोमाने सुरु करण्याची तयारी करून ठेवली होती. जोशी यांची क्वचित चेष्टा व्हायची. बातमीदारांमधील हेवेदावे, चेष्टा मस्करी चालायची. पण ते त्यापासून अलिप्त असलेले मी पाहिले आहे. आशिष तू म्हणतो तसं प्रोत्साहन त्यांनी इतरांनाही दिलं असणारच.
पुढे मोठे झालेल्या आशिष सारख्या ख्यातकीर्त बातमीदारांनी त्यांची कृतज्ञतापुर्वक आठवण ठेवली हे महत्त्वाचं!

किरण ठाकूर

०४०८२०१८Ashishhttps://www.blogger.com/profile/10562144488848910318noreply@blogger.com