शब्द सुंदर तेथे राम... This place is to know various aspects that i present through my various news and articles.
Thursday, August 26, 2010
जरा सांभाळून बोला...
अमितची बदनामी करणा-यांचा तीव्र निषेध...
गेल्या दोन आठवड्यात दोन बातम्या ऐकून मन खूप व्यथित झालं. (व्यथित हा शब्द खूप जड वाटत असेल तर खूप वाईट वाटलं, असे वाचावे) एक म्हणजे विश्ननाथन आनंद हा हिंदुस्थानी नाही, असा जावईशोध केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने लावला. आणि दुसरे म्हणजे झी २४ तासचा प्रतिनिधी आणि आमचा जिवलग मित्र (GD) अमित जोशी याने मुलींची छेड काढली म्हणून त्याला लोकांनी मारला - इति आरं आरं आबा.
द ग्रेट आणि ट्रू जिनिअस असणारा विश्वनाथन आनंद हिंदुस्थानी नाही. मग हिंदुस्थानी कोण... अहो ज्या माणसामुळं आज हिंदुस्थान बुद्धिबळामध्ये सुपर पॉवर बनू पाहतोय, ज्याच्यामुळे पुण्यापासून ते चेन्नईपर्यंत शेकडो नव्हे हजारो जण बुद्धिबळामध्ये करियर करण्याचा विचार करु लागले, ज्याने असंख्य वेळा हिंदुस्थानचा तिरंगा जगभरात फडकावला, तो आनंद हिंदुस्थानी नाही. अहो मग हिंदुस्थानी कोण. एसी ऑफिसमध्ये बसून निर्णय घेणारे आयएएस अधिकारी, मनुष्य बळाच्या नावाखाली मनुष्य छळ करणारे एचआर वाले की आनंदच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतरही त्याबद्दल अनभिज्ञ असणारे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल. असो त्यावर बरंच चर्वित चर्वण झालंय आणि त्यावर उमटलेली रिऍक्शन इतकी स्ट्राँग होती की, तत्काळ केंद्रीय मंत्र्यांना स्वतः फोन करुन माफी मागावी लागली. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्यात-लिहिण्यात काय उपयोग नाही.
दुसरा मुद्द अमित जोशीचा. गृहमंत्र्यांनी अमितबद्दल जे बिनबुडाचं वक्तव्य केलंय त्याचा करावा तितका निषेध थोडा आहे. (मी असं म्हटलोच नाही, अशी टिप्पिकल पॉलिटिकल भूमिका घेत दुस-याच दिवशी आरं आरं आबांनी कोलांटउडी मारली) म्हणजे अमित जोशीनं पोरीची छेडछाड काढली. अहो एकवेळ एखादी पोरगी अमित जोशीची छेडछाड काढेल. पण अमित जोशी त्याच्या स्वप्नातही तसं करु शकणार नाही. त्याची इतकी ठाम खात्री मी देऊ शकतो कारण हैदराबादमध्ये ई टीव्हीत असताना मी आणि अमित जवळपास एक ते दीड वर्षे रुममेट (घरभाऊ) होतो. त्याच्याइतका सज्जन आणि सालस मुलगा आख्ख्या ई टीव्हीत नव्हता. किमान आम्ही तरी पाहिली नव्हता.
पत्रकारितेची परीक्षा उत्तीर्ण होऊन ताज्या दमाचा अमित ई टीव्हीत दाखल झाला होता. त्याची ती पहिलीच नोकरी. मी १२ जुलैला (२००३) ई टीव्हीमध्ये जॉईन झालो आणि तो १४ जूनला. त्यामुळे मी, अमित, सचिन फुलपगारे, सचिन देशपांडे आम्ही चौघांनी दिलसुखनगरला एकाच घरात रहायचो. (नंतर राजेंद्र हुंजे आणि श्रीरंग खरे यांनी दोघांना रिप्लेस केलं.) गडकिल्ले, ट्रेकिंग, पुस्तक आणि पेपर वाचन, कॉपी सुधारणं, बातमी अधिकाधिक चांगली कशा पद्धतीनं देता येईल आणि जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल, यामध्येच त्याचा सारा वेळ जायचा. ऑफिसमध्ये आणि घरी एकत्रच असल्यामुळे मला त्याची खडा न् खडा माहिती होती. आम्ही गंमती गंमतीमध्ये जरी कधी एखाद्या मुलीचा विषय काढला किंवा एखाद्या मुलीवरुन त्याला चिडवलं तरी त्याला त्यामध्ये फारसं स्वारस्य नसायचं.
ई टीव्हीमध्ये त्यावेळी असलेल्या एका मुलीवरुन आम्ही त्याला कायम चिडवायचो. (ई टीव्हीमध्ये असलेल्यांना ते नाव माहिती आहे. सो ते इथे उघड करत नाही.) ते दोघं खूप चांगले मित्र होते. आम्ही त्याला नेहमी म्हणायचो की, बघ ती तुझ्यावर फिदा आहे, बघ, प्रपोज मारुन टाक इ.इ. पण अमित त्यामुळं कधीच हुरळून गेला नाही किंवा आमच्या बोलण्याला बळीही पडला नाही. आमची पवित्र मैत्री आहे... या पलिकडे त्यानं कधी उडी मारली नाही. सांगण्याचा उद्देश्य असा की, पोरींची छेडछाड, लफडी, अफेअर्स हा त्याचा प्रांतच नाही. गड किल्ल्यांवर हिंडायचं, कोणते तरी भोकातले कोणालाही माहिती नसलेले किल्ले सर करायचे आणि त्याबद्दल मित्रांना सांगायचे, हा त्याचा आवडता छंद. वेगवेगळ्या पदार्थांवर दाबून ताव मारायचा, मनसोक्त हादडायचं ही त्याची आवड. बसमधून किंवा काही वेळा आठ-आठ किलोमीटर चालत हैदराबाद पालथं घालायचं, ही त्याची सवय. (हा पठ्ठ्या मुंबईहून हैदराबाद सायकलवरुन येणार होता. पण त्याला आम्ही वेळीच रोखलं होतं.)
पत्रकारितेतही त्याला उथळपणा पसंत नव्हता. एखाद्या विशिष्ट बीटवर अधिक खोलवर जाऊन बातम्या कशा करता येतील, असा त्याचा प्रयत्न असायचा, असतो. तसं तो बोलूनही दाखवतो. संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, रेल्वे आणि ऑफकोर्स गडकिल्ले हे त्याचे आवडीचे विषय होते. अन् या विषयातील बातम्या कव्हर करण्यासाठी, अधिक जाणून घेण्यासाठी तो सदैव तयार असतो, उत्सुक असतो. लफडी करुन पोरी पटवायच्या आणि मजा मारायची, असल्या गोष्टींसाठी त्याच्याकडे कधीच वेळ नव्हता. वेळ असला तरी त्याला इच्छा नव्हती. कधी कधी त्याच्या या आरबट चरबटपणाची आम्ही खिल्ली उडवायचो, त्याची खेचायचो, त्याची चारचौघांत टिंगलटवाळी करायचो, पण अमितच्या साधेपणाबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नव्हती आणि नाहीही. अंडी देखील धुवून घेणारा, चार जणांसाठी पातेलंभर चहा करणारा, साजूक तुपामध्ये आमटी करणा-या आमच्या या मित्राची आम्ही भरपूर चेष्टा केली. त्याच्या पुढे केली. त्याच्या पाठीवर कधी नाही केली. त्याच्या या अतरंगीपणाबद्दल आम्ही अक्षरशः लोळायचो. हसून हसून पोट दुखायचं.
पण आबांसारख्या जबाबदार माणसानं कोणतीही खातरजमा न करता अशोभनीय विधान करुन आम्हा सर्वांनाच धक्का दिला. असल्या फालतू गोष्टींचा विचार आमच्या मनातही कधी आला नाही, तो आबांनी जगजाहीरपणे बोलून दाखविला. दु्र्दैव दुसरे ते काय. त्यामुळे आबा तुम्ही स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्नशील असताना. मग मिळालेल्या माहितीची खातरजमा न करता केलेल्या वक्तव्यामुळे दुस-याची प्रतिमा काळवंडणार नाही, याची खबरदारी बाळगा. (त्या परिसरातल्या एका पोलिस अधिका-यांच्या वसुली एजंटांनीच अमितवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसही त्यांना अडविण्यासाठी पुढे सरसावले नाहीत, अशी चर्चा कानावर आली. तथ्य ते काय माहिती नाही. पण त्या अधिका-यानेच तर ही माहिती आबांना पुरविली नसेल ना, अशी शंका राहून राहून येते.)कालच केईममध्ये जाऊन त्याला भेटून आलो. अमितनंही आबांच्या वक्तव्याचा मुद्दा फारसा गांभीर्यानं घेतला नव्हता. पण मला रहावलं नाही. अगदी आपल्या जिवलग मित्राबद्दल कोणीतरी काहीतरी फालतू बडबड करतंय, असं समजल्यानंतर मन अस्वस्थ झालं, म्हणून हा लेखप्रपंच.
(एक महिन्याच्या विश्रांतीनंतर अमित पुन्हा ताज्या दमानं फिल्डवर रुजू होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.)
No worries Amit,
ReplyDeletePoliticians chya statements na kiti seriously ghayayche te amhala mahit ahe.
प्रिय आशीष,
ReplyDeleteछान लिहिलं आहेस. अमितबद्दल इतकं तपशिलात ठाऊक नव्हतं. पण, अमितशी असलेली मैत्री आणि आबा काय म्हणाले याच्या पलिकडे जाऊन वाहिन्यांच्या वातार्हरांना मारहाण का होतेय याबद्दल तू काहीतरी लिहायला हवं होतंस. माझा एक डॉक्टर मित्र बऱ्याचदा म्हणतो, की आम्ही डॉक्टर स्वतःला देव समजायला लागलो आणि लोकं आम्हाला धोपटायला लागले. आता तुम्ही (पक्षी पत्रकार) स्वतःला ग्रेट समजायला लागला आहात, त्यामुळे धोपटले जाण्याची वेळ आता तुमची आहे. त्याची अशी भावना होण्याची जी कारणे आहेत, ती खरी आहेत आणि त्यांचा फटका असा केव्हातरी अमितसारख्या सज्जनांना बसतो, असे नाही का तुला वाटत?
बाय द वे देवरूखजवळ कुठे आहे तुझं गाव? मी ही तिथलाच आहे. उसगावचा.
Abhijit Mulye
आशिष तू लिहीलेले अगदी खरे आहे. सज्जन हा एकमेव शब्द वापरावा असा अमित आहे. मी त्याच्या बरोबर झी चोवीस तासला काही महिने काम केले आहे. खरोखर एखाद्या विषयाच्या खोलात शिरून काम करणारा हा मुलगा आहे. मुलींची छेड काढणं आणि असला फालतूपणा करणं त्याला आयुष्यात कधी जमणारच नाही.
ReplyDeleteआदरणीय, प्रातःस्मरणीय आर आर पाटलांनी आधी स्वतः काय बोलतोय त्याचा विचार करून बोलावं. या आर आर पाटलांना मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दलच उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. याची जाण त्यांनी ठेवावी. अमितबाबत त्यांनी चूकीचं विधान केलं आहे.
Amitvar lihlas yabaddl mi abhari ahe. Amitvar amha saglya gharatil lokanchahi vishwas ahe. To anyayaviruddha nehmich chidto. pan tyach pratikriya hi nehmi practical aste. Tyamule tyacha samjudar panabaddalhi amhala khup abhimanach ahe. (by d way ti e tv madhil mulgi kon ahe?)
ReplyDeleteDear Chandorkar, The blog is fascinating one. Amit Joshi is admitted in KEM Pune or Mumbai?
ReplyDeleteThat piece is also good.
Yours,
Arvind V.Gokhale
Good.
ReplyDeletenew additions. keep it up. what are you doing these days?
Umesh Deshpande
एखाद्या लेखका सारखं सराईत लिखाण होतं आहे, असं जाणवत आहे. मनापासून सांगतोय छान वाटलं म्हणून
ReplyDeleteअनिल
Yes...Ashish Moral Support is More IMP than, many other physical thing, in such situation.
ReplyDeleteFor Amit..Get Well Soon..My Friend..!
अमित कदाचित माझी ओळख विसरला असेल, पण मला लक्षात आहे. तो, मी आणि आशुतोष जोशी (ह.मु. रॉयटर्स, बंगलोर) आम्ही तिघांनी एकत्र ईटीव्हीचा इंटरव्ह्यू दिला होता. तू केलेल्या उल्लेखांवरून त्यावेळच्या तीन-चार दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या. अमित लवकर बरा होवो, ही सदिच्छा.
ReplyDelete- अमित टेकाळे, पुणे
kharay agadi amit joshi khupach sajjan manus aahe...mi tyachya barobar kam kel aahe to ek changla manus ani patrakar aahe
ReplyDeleteजय हो पत्रकारितेचा जय हो...! सच्चा पत्रकार जागा झाला म्हणूनच.....भ्याड हल्ला झाला....! Keep it up...
ReplyDeleteतुम्ही एक पत्रकार आणि त्यात त्याचे मित्र तुम्ही त्याची तरफदारी हि करणारच. खरे खोटे याची शहानिशा न करत तुम्ही पत्रकार वाट्टेल ते लिहिता अन तुमच्याबद्दल खरे जरी बोलले तरी सगळेजण उठलेच लेखणीची ती तलवार घेऊन.
ReplyDeleteaashish sir, amit joshi chi parshwbhumi lihun tumhi tyanchya baddal kunachya manat kahi shanka aslya tar tya dur kelya aahet..
ReplyDeleteAnil Paulkar,
Latur.
Great... But did you say Politicans as a responsible or accountable lot? LOMAL... it means Laughing out my ass loudly. It is common man who is responsible for everything bad. And a Politician for everything good... And that's Indian Politics at all levels.
ReplyDeleteAata khaan paan chi post hounjaau de re blog var... kaavle bolaayla laagle aahet aata potaat ;)
ReplyDeleteashish abasarkhya mediocre politician la apan madhyamanich garjepeksha jasti prasiddhi dili ata apan aplya karmachi phale bhogat ahot itkech
ReplyDeleteMakarand Gadgil
Chaan lihilays! Tumhi patrakar mandalinich ekhade nipakshapaati vruttapatra kaadhaychi garaj aahe (Himmat kiva Independent saarkhe).
ReplyDeleteRavi Godbole
आशिष ! तुमचा अमित जोशींवरचा ब्लॉग सणसणीत आहे. ज्यांनी त्यांच्याबाबत ' उचलली जीभ, लावली टाळ्याला'टाइप विधानं केली, त्यांच्या डोळ्यांसमोर दिवसा काजवे चमकवणारा !
ReplyDeleteAjit Waykar