Sunday, December 19, 2010

नशीब सामनात कॉस्ट कटिंग नव्हतं...

कॉस्ट कटिंग हा शब्द अनेक संस्थांमध्ये (फक्त वृत्तपत्र नव्हे...) सगळ्यांत जास्त लोकप्रिय शब्द आहे. जागतिक मंदीच्या काळात तर या शब्दाला खूप महत्व प्राप्त झालं होतं. अनेकांचे अनेक अनुभव असतात. तसेच माझेही काही अनुभव आहेत. त्यामुळेच मला म्हणावसं वाटतं की, नशीब सामनामध्ये कॉस्ट कटिंग नव्हतं.

१) कॉस्ट कटिंगच्या नावाखाली (किंवा परफॉर्मन्स नाही, असे कारण देऊन) सामनातून एकाही व्यक्तीला काढून टाकण्यात आलेले नाही. हा मुद्दा मला सर्वाधिक लक्षवेधी वाटतो. अर्थातच, हे संजय राऊत साहेबांचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. काही वर्षांपूर्वी यांत्रिक पद्धतीने कामाची सुरवात झाल्यानंतरही कामगारांना काढून न टाकता, त्यांना नवे काम शिकण्याची संधी देण्यात आली. ती मंडळी अजूनही सामनामध्ये आहेत आणि यथायोग्य पद्धतीने काम करीत आहेत. जागतिक आर्थिक मंदी असतानाही सामनात माणुसकीचे कॉस्ट कटिंग कधीच झाले नाही.

२) जागतिक मंदी आली म्हणून कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ऑफिसातले एसी बंद करण्यात आले नाहीत. एसीच्या ऐवजी मंगल कार्यालयात लावतात तसे घों घों करणारे मोठ्ठाले पंखे ऑफिसात लावण्यात आले नाहीत. शिवाय बंद ऑफिसमध्ये एसीची काहीच गरज नाही, हे सांगण्यासाठी लेक्चर्सही देण्यात आली नाहीत. कर्मचा-यांच्या सोयीसुविधांचे कॉस्ट कटिंग तर अजिबात नाही.

३) कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ऑफिसातील निम्मे ट्यूब लाईट आणि निम्मे दिवे काढून टाकण्याचे (न लावण्याचे नव्हे) फर्मान साहेबांनी काढले नाही. विजेची बचत म्हणून दिवे न लावणे समजण्यासारखे आहे. पण बचत म्हणून दहापैकी फक्त चारच दिवे लावायचे आणि उरलेले सहा दिवे काढून टाकायचे, असले दळभद्री प्रकार सामनात अनुभवयास मिळाले नाहीत.

४) सामनात दररोज तीन-चार वेळा महाराज चहा घेऊन येतो. (राजेश शहा, विद्याधर चिंदरकरसाहेब आणि अनेक जण त्याला जहर म्हणून हिणवतात.) या चहाचे बिल कंपनी अदा करते. पण जागतिक मंदीचे कारण पुढे करत सामनाने चहा बंद केला नाही. दोन रुपयाचा चहा दिला म्हणून कोणी मोठा होत नाही आणि तेथे काम करणा-यांनाही दोन रुपयाच्या चहाने स्वर्गसुख मिळत नाही. पण द्यायची दानत लागते, हेच महत्वाचे. थोडक्यात काय तर प्रभादेवीत द्यायच्या वृत्तीचेही कॉस्ट कटिंग झाले नाही.

५) एखादी घटना एन्जॉय करण्याचा आनंद वेगळाच असतो. पण अशा एन्जॉयमेंटलाही कॉस्ट कटिंगचे कारण देऊन फाटा दिला जातो. मग एखाद्या गोष्टीच्या लॉन्चिंगची पार्टीही सामोसा आणि वेफर्सवर भागविली जाते. एखाद्या हॉटेलात जेवण देणंही कंपनीला परवडत नाही आणि कारण दिलं जातं, आपण असं करत नाही. पण सामनात असली फालतुचं कॉस्ट कटिंग नव्हतं. राऊत साहेबांना खासदारकीचं तिकिट मिळणं असो किंवा उद्धव साहेबांची मिटिंग असो, सगळं कसं एकदम जोरात. आनंद आणि मौजमजेचे कॉस्ट कटिंग मला प्रभादेवीत कधीच आढळले नाही. इतकंच काय तर क्वचित प्रसंगी रात्री मुक्काम करण्याची वेळ आली तर घरी जाण्यासाठी किंवा जेवणासाठी लागणारे पैसे देतानाही, कंपनीचा कधीच हात आखडता झाला नाही. शिवाय मांसाहारी जेवणाचं बिल मिळणार नाही, अशी भंपक कारणंही अकांऊट्स डिपार्टमेंट पुढं करायची नाहीत.

६) कंपनीत घेताना एक पगार सांगायचा, पत्र देताना वेगळीच फिगर दाखवायची आणि प्रत्यक्ष हातात येणारा पगार भलताच, अशी फसवाफसवी करुन बचत करण्याची वृत्ती मला सामनात अनुभवायला मिळाली नाही. राऊत साहेबांनी शब्द दिला म्हणजे दिला. त्याच्या अलिकडे नाही आणि पलिकडेही नाही. इथे वचननामा पाळला जातो, असंच म्हटलं पाहिजे. कामगारांच्या पगारातून कॉस्ट कटिंग करुन जागतिक मंदीला पळवून लावण्याचा बनाव करण्याचं धोरण सामनात नाही. त्यामुळंच इथं येणारा माणूस पगार मिळाल्यानंतरही खूष होऊन काम करतो. हातात पगार पडल्यानंतर डोळे फिरण्याची वेळ कामगारांवर येत नाही. समाधानाच्या बाबतीत तर कॉस्ट कटिंगमधला क पण इथं सापडत नाही.

७) सामना म्हणजे हास्यविनोदांची पंढरी. स्वतः राऊत साहेब विनोद करुन स्वतः हास्यकल्लोळात बुडून जायचे. समोरच्याची विकेट कधी काढायचे कळायचं देखील नाही. उगाचच चेह-यावर गांभीर्याचा मुखवटा चढवून जड मुद्रेनं वावरायचं, हे सामनाच्या स्वभावातच बसत नाही. शिवाय पाच डेसिबलपेक्षा कमी आवाजातच हसायचं वगैरे बंधनही नाही. त्यामुळे विनोदी वृत्ती आणि हसण्याखिदळण्याचं कॉस्ट कटिंग कधीच अनुभवलं नाही.

८) असं असतानाही सामनात मात्र, काही गोष्टींचं कॉस्ट कटिंग नक्कीच होतं. उगाचच आपण जागतिक स्तरावरचे अग्रगण्य आहोत, अशा थाटात वावरायचं आणि पगार तसेच सेवासुविधा गल्लीतल्या पेपरसारख्या पुरवायच्या, अशा कद्रू वृत्तीचं मात्र कॉस्ट कटिंग सामनात नक्कीच होतं. मिटिंगांचं कॉस्ट कटिंग होतं. रिपोर्टांचं कॉस्ट कटिंग होतं. इंटरनेटवरच्या वापरावर असलेल्या बंधनांचं कॉस्ट कटिंग होतं. पत्रकारांच्या कल्पना आणि स्वातंत्र्यावर असलेल्या परंपरेच्या बोज्याचं कॉस्ट कटिंग होतं.

गेल्या अनेक दिवसांपासून सामनातील कॉस्ट कटिंगवर लिहायचं होतं. पण आज वेळ मिळाला आणि ब्लॉग उतरला. आता या विषयाचं थोडंसं कॉस्ट कटिंग करुन पुन्हा एकदा खाद्यजत्रेला सुरुवात करावीशी वाटते आहे. गोव्याची ट्रीप, कोल्हापूरचा दावणगिरी लोणी डोसा, पेशवाई थाटाचं श्रेयस आणि `बाद`शाही इइ अनेक विषयांवर लिहायचं आहे. जसा वेळ मिळत जाईल तसं तसं लिहीत जाईन.

(शेवटी तुम्ही सगळीकडे नोकरीच करणार. कामगार तो कामगार तो कितीही बदलला तरी त्याची झेप वर्तुळाबाहेर जात नाही.आणि वर्तुळाला काही केंद्रबिंदू सापडत नाही, अशा निनावी कॉमेंट्सना मी फार महत्व देत नाही. त्यामुळे अशा लोकांनी नावाने कॉमेंट्स टाकण्याची हिंमत दाखवावी. अन्यथा वेळेचा आणि शब्दांचा अपव्यय टाळणेच इष्ट. धन्यवाद. )

18 comments:

  1. Anonymous4:40 pm

    cost cuttingchya.....GHO

    ReplyDelete
  2. Anonymous5:33 pm

    चांगले व्यवस्थापक असेच वागतात.

    Charu Bhide

    ReplyDelete
  3. Anonymous5:52 pm

    सामनाच्या नथीतून सकाळवर तीर मारलेला दिसतोय.

    ReplyDelete
  4. प्रिय
    आशिषजी आपण व्यक्त केलेल्या सामनामधील जिवंत आठवणी आणि कोस्ट कटिंग खूप मस्त वाटल्या!
    सामनातील आठवणी वाचताना आपणही तो आनंद लुटतोय असेच वाटत होते!
    खूप छान!
    आपला
    भारत रांजणकर

    ReplyDelete
  5. Anonymous11:06 pm

    point number 6... aavadla re...jhakaas...

    ReplyDelete
  6. Ashish mast aahe. tula kadachit raag yeu shakel, pan tari ek vicharto, etke sagle chaan watawaran astana ajunhi samna maage ka.... ase environment milat asel tar sagalyani jeev todun kaam karun samna ek no. la ka aanat nahit. (arthat samna la dar 4-6 mahinyani aamhich kase No. 1 aahot ashi aaplyach papermadhe jahiraat karanyachi saway nahi.)
    regards,
    Sagar nene

    ReplyDelete
  7. Khup Chan! Keep going dear...


    Ashok Vyavahare.

    ReplyDelete
  8. balasaheb12:48 pm

    सर
    आपन वस्तुश्तिति लिहिलि आहे
    असो आपले लेख छान असतात.

    ReplyDelete
  9. सागर, मुळात सामना मागे असेल पण तो खपाच्या बाबतीत. बातम्यांच्या बाबतीत सामना मागे आहे, असे मानण्यास मी तयार नाही. कारण आमचा नंबर एक आहे, अशा जाहिराती स्वतःच्याच पेपरमध्ये देणाऱ्या वर्तमानपत्राच्या संपादकांची सकाळ सामनाचे कौतुक केल्याशिवाय जात नाही. जरा सामना वाचत जा, त्यांच्यासारखी भाषा, लेआऊट करत जा, असं तेच संपादक मिटिंगांमध्ये सांगायचे. शिवाय इतर पेपरमध्ये नसलेल्या किंवा चुकलेल्या छोट्या छोट्या बातम्याही सामनामध्ये हमखास असतात. खपाच्या बाबतीत सामना मागे आहे कारण सामनाचा सगळा खप हा स्टालवरचा आहे. घराघरात सामना घेणारे खूप कमी आहेत. कारण त्याचे मार्केटिंग तितकेसे स्ट्रान्ग नाही. शिवाय ते कोणतीही स्कीम देत नाहीत. त्यामुळे खपाच्या बाबतीत सामना मागे आहे. पणा दर्जा आणि बातम्यांच्या बाबतीत सामना मागे आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

    ReplyDelete
  10. Anonymous2:07 pm

    Jagtik mandicha navakhali dhong ... nete ekdam kadak

    Amit Patil

    ReplyDelete
  11. kharach,kahi weles anek kahi goshti samna kadun shiknyasarkhya ahet.jase tyanchi wucharsarni aso wa management.kadhihi kalanusar badalat nahi.aplya tatwanwar tham astat.mala he patate ki recession kalatahi samana ne tag dharala hota nawhe cost cutting keli nahi..

    ReplyDelete
  12. ब्लॉग आवडला...आपल्या लेखनाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आम्ही नेहमीच आपल्या लेखनीचा आमच्या गप्पांमध्ये उल्लेख करतो. हा ब्लॉग वाचून मी एवढेच म्हणेन सत्य नेहमी कटू असते.

    ReplyDelete
  13. Anonymous6:30 pm

    atta ma ta la shiwya Kadhi? Te tar mast cost cutting kartat.

    ReplyDelete
  14. Ravikiran11:03 pm

    ashish sir, he chan lihalt aata malahi samanat kaam karaychi icha zali aahe. sandhi milel ka kalpana dyavi r.g.galge@gmail.com war mail karawa.

    ReplyDelete
  15. Anonymous6:28 pm

    This is Subject for writing ?

    Sachin Deshpande

    ReplyDelete
  16. Anonymous3:38 pm

    आशिषराव, सकाळ चं आधी आपण कोठे होता हे विसरू नका. आज आपण हे सर्व लिहू आणि बोलू शकता ते केवळ सकाळ मुळे. मुळात आपली प्रवृत्ती च अशी आहे असे वाटते. सामना येवढा चांगल होता तर तो सोडला का? पुण्यातही सामनाची edition आहे.
    दुसरे म्हणजे, हे cost cutting बद्दल आपण जे काही लिहिले त्यला काही आधार नाही. आपली लायकी नसताना सकाळ ने आपणास घेतले होते हे विसरू नका.

    ReplyDelete
  17. Anonymous3:53 pm

    yane samna sodala nahi tyala kadhale aahe, tyamule motha manbahavipanacha aaw anun ha gamja marat aahe,aso

    ReplyDelete
  18. vachun bar vatal.

    ReplyDelete