
जळू बाई जळू, फोटोंचा प्रतिसाद पाहून जळू...
सुचली नाही आयडिया म्हणून दूर दूर पळू...
.
बँकेत, शाळेत, ऑफिसात, देवळी एकच रंग दिसावा
मटाच्या रंगामध्ये अवघा परिसर न्हाऊन निघावा
.
नवरंगच्या प्रतिसादामुळे पोटात लागले दुखू
एकच रंग पाहून लोकांचे डोळे लागले फिरु
.
मग सकाळी सकाळी कोणा आयडिया सुचे छान
म्हणे, जा बाबा जा दुसरे फोटो काढून तरी आण
.
'भगवान से भी नही लगता' अशा ठिकाणी लागला कॉल
वेगवेगळ्या रंगाच्या साड्यांनी भरुन गेला होता सारा हॉल
.
मग काय साहेब झाले भलतेच खूष
'सप्तरंगी' साड्यांचे फोटो काढले खूप खूप
.
नवरंगातल्या पैठणीपुढे 'सप्तरंगी' दिसे जनता साडी
कोत्या वृत्तीच्या मनांची दूरच होत नाही अढी
.
खुन्नस देण्यासाठीची आयडिया कशी आली अंगाशी
पुणेकरांच्या लक्षात आली असली फालतू मखलाशी
.
दास म्हणजे लोका, करु नका दुसऱ्यांची नक्कल
कल्पनांचा असेल दुष्काळ तर बदाम खा बक्कळ
.
मटाच्या नवरंगांना पुणेकरांनी आपलेसे केले
जळूबाई जळू फक्त हात चोळत बसले
.
जळू बाई जळू, फोटोंचा प्रतिसाद पाहून जळू...
सुचली नाही आयडिया म्हणून दूर दूर पळू...
वा कविराज... तुमच्या प्रतिभेचा नवा रंग दिसला... खूपच मस्त...
ReplyDeleteShripad Brahme
वावावा...कविवर्य आशिषराव तुमची चांदोरकरी काव्यप्रतिभा चांगलीच खुलली आहे, अगदी पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे...उत्तमोत्तम आणि दीर्घ कविता सादर करून प्रस्थापित साहित्यिकांना दे धक्का देण्याचे तुमचे तंत्र लाजवाब...आवडले बुवा आपल्याला...
ReplyDeleteVihang Mukund Ghate
Lai bahri :p
ReplyDeletePanse Prasad
कळले अापणास सत्य, तरी बोलू थोडं हळू हळू.. !!!
ReplyDeleteChinmay Patankar
Khup bhari...
ReplyDeleteAbhijit Kolpe
मस्त... लय भारी... मग सकाळी सकाळी कोणा आयडिया सुचे छान... व्वा.. व्वा.. व्वा...
ReplyDeleteAmol Paranjpe
पोटदुखीवर चांगले औषध आहे का? पुण्यात त्याचा मजबूत साठा लागणार आहे :P
ReplyDeleteVikrant Deshmukh