अरे, अर्धी चड्डीवाले
आले की!
१६ मे २०१४… भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवण्यासारखा दिवस. भारतीय जनता पक्ष या दिवशी स्वबळावर सत्तेवर आला. १९५१ साली स्थापन झालेल्या जनसंघाचे पहिल्या निवडणुकीत तीन, तर १९८० साली स्थापन झालेल्या भाजपचे १९८४ मध्ये अवघे दोन खासदार संसदेत पोहोचले होते. त्याच भाजपने १६ मे रोजी स्वबळावर दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न साकार केले आहे.
जनसंघाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना किती आनंद झाला असता आजचा हा सुवर्णदिन पाहून. ‘एक देश में दोन विधान, दोन निशान, दो प्रधान… नही चलेंगे नही चलेंगे…’ असं म्हणत जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलन करताना तुरुंगात गेलेल्या श्यामाप्रसाद यांचा तुरुंगातच गूढ मृत्यू झाला. दीनदयाळ यांचा मृतदेह उत्तर प्रदेशातील मुगलसराय रेल्वे स्टेशनच्या परिसरात बेवारस अवस्थेत सापडला. दोन्ही मृत्यू नैसर्गिक नव्हतेच कदाचित. ती राजकीय हत्याच असावी. त्या दोन्ही नेत्यांच्या आत्म्यांना आज खऱ्या अर्थाने शांती लाभली असेल.

भाजपच्या नेतृत्वाखालील
राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तब्बल ३३७ जागा मिळाल्या. पैकी भाजपच्या एकट्याच्या जागा
आहेत २८३. भगवा रंग अंगावर घेण्यास लाज वाटत नाही, अशा भाजप, शिवसेना आणि शिरोमणी अकाली
दलाचे जवळपास तीनशेहून अधिक खासदार लोकसभेत पोहोचले. अनेकांनी प्रयत्न
करूनही त्यांना नरेंद्र मोदींना रोखता आले नाही. अखेरीस भाजपचे सरकार सत्तेवर आलेच. आश्चर्य म्हणजे आयुष्यभर अर्धी
चड्डी अभिमानाने घालणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा भारताचे पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला
आहे. शरद पवार यांच्यासारख्या निष्ठेतील न देखील माहिती नसलेल्या नेत्यांनी कितीही आदळआपट केली तरी शेवटी मोदी दिल्लीच्या तख्तावर विराजमान होणार आहेत. आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे भाजपच्याही किमान निम्म्याहून अधिक खासदारांना ‘अर्धी चड्डी’ घालण्यात कोणताही कमीपणा
वाटत नाही. त्यामुळे भारतीय जनतेने मोठ्या निर्धास्तपणे ‘अर्ध्या चड्डी’च्या हाती देश
सोपविला आहे.
आयुष्यभर ज्यांनी विचार
सर्वतोपरी मानले, संघटनेचा आदेश शिरसावंद्य मानला, असे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार
ही गोष्ट भाजपसाठी आनंदाची, अभिमानाची आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविणारी
आहे. भाजपचा हा विजय नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वामुळे साकारला आहे, यात वादच नाही.
तरीही मला वाटतं, हा विजय भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, स्थापनेपासून आतापर्यंत
भाजप आणि संघपरिवारासाठी रक्ताचे पाणी केलेल्या नेत्यांचा-अधिकाऱ्यांचा आणि सामान्य
भारतीय जनतेचा आहे.
जनसंघाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना किती आनंद झाला असता आजचा हा सुवर्णदिन पाहून. ‘एक देश में दोन विधान, दोन निशान, दो प्रधान… नही चलेंगे नही चलेंगे…’ असं म्हणत जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलन करताना तुरुंगात गेलेल्या श्यामाप्रसाद यांचा तुरुंगातच गूढ मृत्यू झाला. दीनदयाळ यांचा मृतदेह उत्तर प्रदेशातील मुगलसराय रेल्वे स्टेशनच्या परिसरात बेवारस अवस्थेत सापडला. दोन्ही मृत्यू नैसर्गिक नव्हतेच कदाचित. ती राजकीय हत्याच असावी. त्या दोन्ही नेत्यांच्या आत्म्यांना आज खऱ्या अर्थाने शांती लाभली असेल.
या आधी भाजपचे सरकार आले नव्हते का? तर आले होते. तब्बल तीनवेळा आले होते. पण त्यावेळी सरकार स्वबळावर नव्हते. म्हणजे अटलबिहारी वाजपेयी
तीनवेळा भारताचे पंतप्रधान बनले. मात्र, प्रत्येक वेळी सहकारी पक्षांच्या कुबड्या घेऊन.
त्याच सहकारी पक्षांनी वेळोवेळी त्यांना बेजार केले. हैराण केले. मात्र, यंदा नरेंद्र
मोदी यांनी भाजपला स्वबळावर सत्तेत आणले आहे. त्यामुळेच मुखर्जी-उपाध्याय यांना १६
मेच्या दिवशी मुक्ती मिळाली असेल, असे मानायला हरकत नाही. अर्थात, फक्त मुखर्जी-उपाध्यायच नाही. तर भाजपचे
असे कितीतरी नेते होते ज्यांनी आयुष्यभर पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आणि सत्तेचा घास
हाता-तोंडाशी आला असताना त्यांचे वय झाले होते.
के. आर. मलकानी, सुंदरसिंह
भंडारी, कृष्णलाल शर्मा, भाई महावीर, मध्य प्रदेशात कुशाभाऊ ठाकरे, महाराष्ट्रात वसंतराव
भागवत आणि उत्तमराव पाटील, तमिळनाडूत जना कृष्णमूर्ती, केरळमध्ये ओ. राजगोपाल अशी प्रत्येक
राज्यातील भाजप नेत्यांची असंख्य नावे काढता येतील. अर्थातच, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण
अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी या तिघांच्या उल्लेखाशिवाय भाजपचा इतिहास केवळ अपूर्ण आहे.
मात्र, त्यांना त्यांच्या कष्टांचे फळ पुरेसे मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.
उत्तर प्रदेशात फिरताना एक उत्तम घोषणा ऐकायला मिळाली, ‘भाजपा की तीन धरोहर… अटल, अडवाणी
और मनोहर’. किती योग्य आहे ही घोषणा. संघटनेने आदेश दिला म्हणून पक्षाचे काम करायला
लागले आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय निरलस भावनेने काम करीत राहिले. त्या सर्वांच्या
परिश्रमाची फलनिष्पत्ती १६ मे रोजी झाली, असे म्हणायला हरकत नाही.
पण सरकार सत्तेवर आले तरीही अजूनही काही ठिकाणी भाजप शून्यच आहे. तिथे आजही भाजप रुजविण्याचे कार्य सुरूच आहे. अनेक ठिकाणी दगडावर डोके आपटून घेण्यासारखीच परिस्थिती आहे. तरीही कार्यकर्ते तिथं जीव तोडून मेहनत घेत आहेत. हेच पाहा ना. केरळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ओ. राजगोपाल एकाकी झुंजत आहेत. मुस्लिम-ख्रिश्चन यांची प्रचंड लोकसंख्या आणि काँग्रेस तसेच डाव्या आघाडीमध्ये होणारी हिंदू मतांची विभागणी यामुळे तिथे भाजपला यश मिळणे केवळ अशक्य आहे. तरीही ते लढत आहेत. यंदा तर त्यांचा विजय अवघ्या बारा हजार मतांनी हुकला. जी गोष्ट केरळची तीच तमिळनाडूची. तिथे हिंदू मुन्नानीचे पाँडी राधाकृष्ण अथक मेहनत घेऊन लढत आहेत.

अर्थात, फक्त भाजपचेच
नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कितीतरी नेते संघ स्थापनेपासून देशभर प्रचारासाठी
गेले. डॉक्टर हेडगेवार यांच्या एका शब्दासाठी दत्तोपंत ठेंगडी उठून केरळमध्ये गेले
आणि आज तिथं संघाचे सर्वाधिक काम आहे. गायकीचा अभ्यास सोडून यादवराव जोशी यांनी कर्नाटकात
आज बिनतोड काम निर्माण केले आहे. भाऊराव देवरस उत्तर प्रदेशात गेले नि तीच त्यांनी आपली कर्मभूमी
बनविली. शिवरामपंत जोगळेकर तमिळनाडूत गेले आणि तिथे संघाचे काम शिखरावर नेले. बाळासाहेब
देशपांडे यांनी वनवासी कल्याण आश्रमासाठी आयुष्य अर्पण केले. उच्चविद्याविभूषित असलेल्या
अशोक सिंघल यांनी त्यांचे सारे आयुष्य विश्व हिंदू परिषदेच्या संवर्धनात खर्ची घातले.
ही काही पटकन डोळ्यासमोर येणारी नावे असली तरीही अशी असंख्य अगणित नावे.
अर्थात, भाजपला सत्तेवर
आणणे हे काही संघाचे काम नाही. संघ त्यासाठी काम करीतही नाही. मात्र, जेव्हा परिस्थिती
हाताबाहेर जाते आहे, असे लक्षात आल्यानंतर परिवार पूर्णपणे झोकून रणांगणात उतरतो. त्याचाच
प्रत्यय आज आला. भाजपप्रमाणेच संघ आणि परिवारातील अशा अनेक असंख्य पदाधिकाऱ्यांच्या
कष्टांचे काही प्रमाणात चीज झाले, असे म्हणायला हरकत नाही.
जनसंघाच्या स्थापनेनंतर किंवा भाजपच्या निर्मितीनंतर अनेकांना माहिती होते, की आपल्याला पडण्यासाठीच उभे रहायचे आहे. भाजपच्या पक्क्या मतदारांनाही माहिती होते, की आपला उमेदवार काही जिंकत नाही. तरीही त्यांनी पडणाऱ्या उमेदवारावर निष्ठेने वर्षानुवर्षे शिक्के मारले. डावीकडे नाव न पाहता उजवीकडे शिक्के मारत राहिले. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि मतदार पक्षाशी एकनिष्ठ राहिले, अशा कोट्यवधी लोकांच्या जीवावरच भाजपला आजचे हे सुगीचे दिवस पहायला मिळाले आहेत.
आणखी एक गोष्ट म्हणजे सामान्य मतदाराला याचे श्रेय देण्यापासून कोण रोखू शकेल. सामान्य मतदार सर्वाधिक हुशार आणि चतुर आहे. अनेकदा राजकारणी त्याला गृहित धरतात. मात्र, तो आपली ताकद निवडणुकीमध्ये दाखवूनच देतो. भाजपच्या अनेक उमेदवारांचे लाखांच्या फरकाने झालेले विजय हे त्याचेच द्योतक आहे. इतक्या फरकाने उमेदवार जिंकतील, हे खुद्द उमेदवारांनाही आणि राजकीय विश्लेषकांनाही वाटत नव्हते. मात्र, तसे झाले आहे. ते केवळ आणि केवळ मतदारराजाच्या इच्छेमुळे. सत्ताधारी नको आणि मोदीच हवा, या एका आणि एकाच इच्छेमुळे प्रचंड बहुमतांनी त्यांनी भाजपला विजयी केले आहे.

सर्वात शेवटी म्हणजे
भाजपचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता. कोणत्याही हेतूशिवाय तो काम करीत राहिला. ना त्याला दिवसाच्या पाचशे रुपयांच्या आमिषाची हाव होती, ना बिर्याणी-दारूची. ज्याने आयुष्यभर पोस्टर्स चिटकविली, भिंती रंगविल्या,
आयुष्यभर स्लिपा वाटल्या नि गमतीने म्हणतात तसं सतरंज्या घातल्या, त्या सामान्य कार्यकर्त्यामुळंच
भाजपला आज हे दिवस आले आहेत. पूर्वी भाजपचा कार्यकर्ता अशी कामं करायचा. हाच कार्यकर्ता
आता फेसबुक, ट्वीटर नि सोशल मीडियावर भाजपचा प्रचार करतो. स्वतःची पदरमोड करून लष्कराच्या
भाकऱ्या भाजतो. त्याला पक्षाकडून काहीही अपेक्षा नसते. भाजपच्या ह्याच सामान्यातील
सामान्य कार्यकर्त्यामुळे नरेंद्र मोदी सत्तेचा सोपान स्वबळावर चढले आहेत.
मुख्य म्हणजे नरेंद्र मोदीही ही गोष्ट आनंदानं मान्य करतील. पराभव झाला तर सामूहिक जबाबदारी आणि विजयी झालो तर फक्त माझ्यामुळे ही काँग्रेसी परंपरा भाजपमध्ये नाही. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांचे श्रेय मोदीही मान्य करतीलच.

तेव्हा नरेंद्र मोदी
यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
आता ख-याअर्थी हिंदुस्तान हिंदू राष्टृ झाले।
ReplyDeleteतोडलंस मित्रा...नेहमीप्रमाणेच झणझणीत लेख
ReplyDeleteaa gayee modi sarkar....
ReplyDeleteAaj swatahacha abhiman watat ahe.. ki apan eka changlya sanghatneche karykarte ahot...
ReplyDeleteDhananjay Pathare
......
अगदी या विजयानंतर मला सर्व प्रथम शामाप्रसाद मुखर्जी आणि दिनदयाळजींचीच आठवण झाली.
Onkar Danke
मस्त… अंगावर रोमांच आणि डोळ्यांत पाणी आणणारा लेख…!!
ReplyDeleteYogesh Brahme
.......
Aa gyee modi sarkar...
Sourabh Chandorkar
मी काही भाजपा चा कार्यकर्ता नाही तरीसुध्दा यंदा थोडीफार पदरमोड झालीच पण गंमत म्हणजे, तसं कधी जाणवलंच नाही.
ReplyDeleteDombivli Soosaat
........
चलो, अभी अच्छे दिन आनेवालें है...!
Milind Awatade
Hats off to all the selfless leaders and volunteers who have created the foundation for this win. Very well written ashish.
ReplyDeleteMandar Parkhi
.......
Ek baar swayasewak ....aajeevan swayamsewak.
Rajesh Bathija
उत्तम व नेमका आढावा...
ReplyDeleteअंधेरा छटा.. सूरज निकला.. कमल खिला... आणि कोणाच्या कुबड्यांशिवाय याचे श्रेय जनसंघाच्या स्थापनेपासून पासून आजवर घेतलेल्या अथक राजकीय व सामाजिक अविरत परिश्रामाचे आणि ध्येयाकडे अखंड वाटचाल करण्याच्या संघटनेच्या शक्तीचे आहे. मिळालेले यश जेवढे नरेंद्र मोदींचे तेवढेच विना मोबदला वेळ, काम, आणि वेळप्रसंगी पैसा सुद्धा संघटनेकरता देणा-या सामान्य कार्यकर्त्याचे आहे.
Ar Mandar Ghate
.....
Chaan! Abhinandan .. (Soochanaa: Yaapudhe Sakal madhe pravesh bund!!)
Ravi Godbole
....
But this win is due to development and progess agenda and gujrat model and not due to hindu agenda of rss. This fact should never be overlooked.
Harshad Jahagirdar
व्वा भाजपच्या विजयाचे छान विश्लेषण केलेस. कीप इट अप.सागर गोखले
ReplyDelete