व्हेज रेस्तरॉं म्हटले, की डोळ्यासमोर येते ते "टिपिकल' पंजाबी, साउथ इंडियन, मराठी किंवा गुजराती. फार तर चायनीज. हे पदार्थ एकाच ठिकाणी मिळणारी रेस्तरॉंही आहेत; पण या पदार्थांच्या जोडीला इटालियन, मेक्सिकन, थाई व लेबनीज पदार्थदेखील त्याच व्हेज रेस्तरॉंमध्ये मिळाले तर? आहे अशी व्यवस्था असलेले खऱ्या अर्थाने "मल्टी क्युझीन रेस्तरॉं' सातारा रस्त्याजवळील मुकुंदनगरमध्ये आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेले हे रेस्तरॉं आहे "मारीगोल्ड'.
एकाच इमारतीत तळमजल्यावर "बोलिंग ऍली', पहिल्या मजल्यावर "मल्टी क्युझीन रेस्तरॉं', दुसऱ्या मजल्यावर बॅंक्वेट हॉल, लहान मुलांसाठी "व्हिडिओ गेम्स' आणि "स्पोर्टस बार' अशा निरनिराळ्या सुविधा चिराग जैन यांच्या "थ्री डी डेस्टिनेशन'मध्ये उपलब्ध आहेत. तेव्हा उदरभरणाच्या जोडीला मनोरंजनाचा विचार जैन यांनी केल्याचे स्पष्टपणे जाणवते. टापटीप, मांडणीतील सुटसुटीतपणा व भरपूर प्रकाश यामुळे रेस्तरॉंला वेगळाच "रिचनेस' आला आहे. शिवाय एकाच वेळी 108 जण बसतील इतकी आसन व्यवस्था असल्यामुळे जास्त थांबण्याची गरजही नाही.
इडली-सांबारपासून ते "थाई करी'पर्यंत, "खोया काजू मटर' हंडीपासून ते पास्ता-पिझ्झापर्यंत व लखनवी-हैदराबादी बिर्याणीपासून ते "सिझलर्स'पर्यंत विविध ठिकाणच्या खाद्यपदार्थांची रेलचेल "मारीगोल्ड'मध्ये आहे. त्यामुळे एकदा का "मेन्यू कार्ड' हातात घेतले, की कोणता पदार्थ घ्यावा, अशा संभ्रमात पडला नाहीत तरच नवल! अशा परिस्थितीत नेहमीचे भारतीय पदार्थ न मागविता "कॉन्टिनेन्टल' किंवा थाई-लेबनीज पदार्थ "टेस्ट' करा.
"लेबनीज फूड' म्हणाल तर "फलाफेल' विशेष लोकप्रिय आहे. कोबी, सिमला मिरची, भाज्यांचे तुकडे, काबुली चणे, मटार पॅटीस आदी पदार्थांचे "ताहिना' आणि "लेबनीज रेड सॉस'मध्ये घोळून सारण तयार केले जाते. हे सारण मक्याच्या पिठापासून तयार केलेल्या पातळ पोळीमध्ये भरून प्रथम "शॅलो फ्राय' आणि नंतर "बेक' केले जाते. फार तिखट नसलेला हा पदार्थ "स्टार्टर' म्हणून "सर्व्ह' केला जातो. ताहिनी या लेबनीज सॉसची चव विशेष जाणवते.
तुम्हाला थोडी "स्पायसी' डिश हवी असेल, तर "मेक्सिकन फूड'च्या यादीतील "चिमचंगाज' मागवा. उकडलेले मटार, घेवडा, बेबी कॉर्न, अमेरिकन कॉर्न आणि ढोबळी मिरची यांच्यापासून सारण तयार करून स्वादासाठी टोमॅटो सॉस, चीज, मिरपूड, ओरिगानो व इतर मसाले वापरतात. हे सारण मक्याच्या पिठाच्या पातळ पोळीवर पसरून त्याचा रोल तयार करतात. हा रोल "शॅलो फ्राय' व "बेक' करून "साल्सा' अर्थात "मेक्सिकन सॉस' सोबत दिला जातो.
"पास्ता'च्या तीन-चार प्रकारांपैकी "अरेबिता पास्ता विथ रेड सॉस' ही खासियत! टोमॅटो, ओरिगानो, मिरपूड, तुळशीची पाने आदी वापरून तयार केलेला सॉस म्हणजे अरेबिता. अरेबिता वापरून तयार केलेला "पास्ता' नुसता पाहिला, की तोंडाला पाणी सुटणारच ! कधी एकदा हे संपवितो, असे तुम्हाला न वाटल्यासच नवल. अरेबिता पास्ता व त्यावर किसलेले चीज म्हणजे केवळ लाजवाब. सोबतीला आले, लसूण, तिखट मिरची वापरून केलेला "रेड सॉस' आहेच.
"सिझलर्स'मध्ये "इंडियन सफारी' हा नावाप्रमाणेच थोडासा भारतीय चवीकडे झुकणारा प्रकार. गरमागरम बिडाच्या तव्यावर कोबीच्या पानात ठेवलेला भात थेट तुमच्या टेबलवरच आणून ठेवतात. वाफा आणि धूर अशा मिश्रणात समोरची डिश इतकी "टेम्टिंग' असते, की विचारता सोय नाही. शिवाय "बेबी कॉर्न' व "फिंगर चिप्स' यांनी ही डिश गार्निश केलेली असते. सोबतीचा "रेड सॉस' चव वाढविणारा.
छोट्या पण गरम इडलीवर लोणी लेपून सांबारमध्ये डुबणाऱ्या अशा बारा इडल्या एकाच डिशमध्ये आपल्यासमोर आणल्या जातात. हलका फुलका आहार घ्यायचा असेल, तर धाकट्या इडलीची (इडीट्टल) ही डिश जरूर खा. त्याचप्रमाणे "6 लिट्ल यूएफओ' अर्थात विविध भाज्या आणि सॉसेस यांचे टॉपिंग असलेल्या सहा उत्तप्प्यांची "डिश' हे दक्षिण भारतीय "मेन्यू'तील वेगळेपण!
याशिवाय तालू मे, टोमॅटो का शोरबा, बॅंकॉक रेड करी, करारी नझ्झा, पनीर पीपर शाश्लिक, मसाला दाल खिचडी, चिली कॉरिएन्डर राइस व कॉर्न टोमॅटो भरीत हे पदार्थही आवर्जून खाण्याजोगे आहेत. ... आणि हो. जेवण झाल्यानंतर विविध "डेझर्टस' आहेतच; पण तुम्ही अस्सल कॉफीप्रेमी असाल तर फक्त एक कप कॉफी ऑर्डर करा. इतर पदार्थांप्रमाणे तुम्ही कॉफीवरही बेहद्द खूष होऊन घरी परताल याची हमखास खात्री!
मारीगोल्ड रेस्तरॉं
"थ्री डी डेस्टिनेशन',
सुजय गार्डन, मुकुंदनगर
पुणे, 411037.
वेळ सकाळी 11 ते रात्री 11.
hii,
ReplyDeletebara zala tu hya sagalya dish sangitalyas...mala indiamadhye aalyavar problem yenar nahi....heeee...;)---vrushali
मग काय या रविवारी जेवायला जावु म्हणता ?
ReplyDeleteजरा दुरध्वनी क्रमांक देता का ?