Saturday, October 06, 2007

कावळा काळा तरीही निराळा...

कावळा...वर्णानं काळाकुट्ट आणि आवाजही बेसूर. त्याच्याकडं गरुडासारखी ताकद नाही. मोरासारखं सौंदर्य नाही. राजहंसारखा दिमाख नाही किंवा कोकिळेसारखा गळा नाही. त्यामुळे तो कोणालाच आवडत नाही. कोणीच त्याच्या प्रेमात पडत नाही. शिवाय "कावळा बसायला आणि फांदी तुटायला...' आणि "झूठ बोलो कौव्वा काटे, काले कौव्वेसे डरियो...' अशा म्हणी तसेच गाण्यांनी कावळ्याची चांगलीच बदनामी केली आहे.

हिंदू धर्मामध्ये एखाद्या व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या दहाव्याला पिंडाला कावळा शिवला किंवा नाही, याचीच उत्सुकता लोकांना अधिक असते. तो शिवला किंवा शिवला नाही तरी लोकांचा कावळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन काही बदलत नाही. पण लहानपणापासून मला दिसणारा कावळा अगदी वेगळा आहे. कावळ्याबाबतची माझी काही निरीक्षणे मुद्दामून येथे देत आहे.

आमच्या घरी स्वयंपाकघराच्या खिडकीला बाहेरच्या बाजूनं कडप्पा लावण्यात आला असून त्यावर मुबलक संख्येने कावळे आमच्याकडे रोज येत असतात. त्यामुळं कावळा घरावर बसला आणि "काव काव' केली की, पाहुणे आले ही गोष्ट आमच्यासाठी आता रोजचं झालेलं आहे. नित्यनियमाने आमच्या खिडकीवर कावळे व इतर पक्षीसमुदाय येण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या आईची गेल्या अनेक वर्षांपासूनची एक साधी सवय.

बहुतेक घरांमध्ये जेवण झाल्यानंतर जमिनीवर सांडलेले अन्न किंवा वाया गेलेले अन्न प्राण्या-पक्ष्यांना घालण्याची पद्धत असते. पण आमच्याकडे थोडी वेगळी परंपरा आहे. कुकरचं प्रेशर पडल्यानंतर गरमागरम भात प्रथम खिडकी बाहेरच्या कडप्प्यावर ठेवला जातो न देवाला नैवेद्य दाखविण्यापूर्वीच तो कावळ्या-चिमण्यांसाठी वाढला जातो. गरमागरम भात तेथे दिसल्यानंतर कावळे, चिमण्या, कबुतरे, कोकिळ आणि इतर अनेक अनोळखी पक्षी तिथं बसकण मारतात.

प्रत्येक पक्षी प्रथम एक-दोनदा चोच मारतो आणि नंतर थोडासा भात आपल्या घरट्यातील पिल्लांसाठी घेऊन जातो. पक्षी तर आहेतच पण गेल्या काही दिवसांपासून गरमागरम भात खाण्यासाठी पिटुकली खारही आता येऊ लागली आहे. पण या सगळ्या मंडळींना गरम भातच हवा का? ते गार किंवा शिळा भातही खातात. इतकंच काय तर भात नसला तर कच्चे किंवा फोडणीचे पोहे, भिजविलेला साबुदाणा, खिचडी, पोळ्यांचे तुकडे, चिवडा अशा विविध पदार्थांवरही हे पक्षी ताव मारतात.

पूर्वी चिमण्या कुठे गायब झाल्या, असा एक आरडाओरडा सुरु होता. पण तेव्हाही आमच्या घरी रोज चिमण्या भात खाण्यासाठी यायच्या. अगदी बारीक आवाजात चिवचिवाट करीत त्या कधी येऊन जायच्या ते कळायचे देखील नाही. मुद्दामून लांबून पाहिलं तर मग कळायचं की चिमण्या आहेत. कबूतर हा शांततेचं प्रतीक मानला जाणारा पक्षी असला तरी तो स्वच्छतेचा प्रतीक अजिबात नाही. भात खातानाही त्याचं खाणं कमी आणि इतरत्र भात उडविणेच जास्त असतं. त्यामुळं खिडकीवरच्या भाताची शितं घरामध्ये पसरलेली आढळली की कबुतरं येऊन गेली हे निश्‍चित समजावं.

या पार्श्‍वभूमीवर कावळ्याचं वेगळेपण अगदी नजरेत भरण्यासारखं आहे. कावळा एकटा आला आणि खाऊन गेला असं कधीच होत नाही. कडप्प्यावर काहीतरी नवीन पदार्थ ठेवला आहे, असं त्याला दिसलं की तो खिडकीवर येऊन बसतो. जोरजोरात "काव काव' करतो. किमान एक-दोन मिनिटे दोस्त मंडळींना हाळी दिल्यानंतर आणखी तीन-चार कावळे खिडकीपाशी येतात. मग हे चार-पाच कावळे आळीपाळीने तो पदार्थ फस्त करतात. काळा एकटा आला आणि खाऊन गेला असं मी आतापर्यंत तरी पाहिलेलं नाही. स्वतः खाणार आणि चोचीमध्ये इतरांसाठी घेऊन जाणार हा नियमही कधी मोडला नाही. तो इतक्‍या चांगल्या पद्धतीने पदार्थ फस्त करतो की काही विचारु नका. भाताचं एकही शित वाया जात नाही की कबुतराप्रमाणे घरामध्येही येत नाही.

खरं तर कावळा हा मांसाहारी प्राणी. मासे, मटण व चिकन यांचे तुकडे तसंच हाडं हे त्याचं आवडतं खाद्यं. इतकंच काय तर एखादी मेलेली घूस किंवा उंदीर, गाडीखाली आलेलं कुत्र किंवा मांजर हे देखील तो अगदी आवडीनं खातो. पण या पक्ष्यानं एकदाही अशा मांसाहारी तसंच किळसवाण्या पदार्थाचा एक तुकडा देखील खिडकीपाशी आणलेला नाही. या गोष्टीचं तर मला अजूनही अप्रूप आणि आश्‍चर्य आहे. दुसऱ्या ठिकाणी मिळालेल्या या गोष्टी त्याला निवांतपणे कडप्प्यावर बसून खाता आल्या नसत्या का? पण असं अजूनही घडलेलं नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळेच माझी कावळा या पक्ष्याबद्दलची मतं अगदी निराळी आहेत.

10 comments:

Anonymous said...

Mee aapala article wachala aani kawalyala kuthetari Nyay milalyacha anand zala.

Aanakhi nawe wachayla aawadel

Surendra Godane, Nagpur

Devidas Deshpande said...

आपण म्हणता ते खरं आहे. मीही कधी कधी मेलेले झुरळं खिडकीबाहेर टाकतो. ते खाण्यासाठी खूप चिमण्या जमतात. कावळे मात्र अद्याप आले नाहीत.
बाकी कावळ्याबद्दल तुमचे विचार वेगळे आहेत, हे कळालं. मात्र नक्की काय आहेत, हे नाही कळालं. त्यासाठी वाटल्यास आता कचरा निर्मूलनात कावळ्याचे योगदान वगैरे विषयांवर पोस्ट लिहा.

Anonymous said...

स्वतःच्या बांधवांबद्दल गौरवोद्‌गार चांगले लिहिले आहे. परंतु किमान त्यांचे काही गुण घेतले असते तर बरे झाले असते. तुमच्या मातोश्रींची सवय चांगली आहे. परंतु स्वतःबद्दल काय? मला वाटले होते की, गरमागरम अन्न आपण स्वतःच फस्त करीत असाल, त्यानंतरच उरले तर इतरांना हा नियम आपल्याला लागू असावा. तुमच्या खिडकीवर "स्वच्छतेचा सोबती' हा लोगो लावला आहे का? नसेल तर का नाही. सांगितलेले ऐकत नसाल तर किमान नियम तरी पाळा. कावळा इतरांनाही खाण्यास बोलवितो. तु तर आतापर्यंत इतरांना कधी खाऊ घातल्याचे आठवत नाही बुवा.

Anonymous said...

Article wachale. Apratim aahe!!!

Kawlyacha itakya kak-najareni tu nirikshan karat asashil he mahit navhate :-) Aani chimani baddal che observation fantastic aahe

Yogesh Brahme.

Anonymous said...

Aashushji mi aapala KAVLYA varil lekh wachla!
Aapan Kavlyavara khup sundar lihile aahe!
Matr drawback cha ullekh Kela astat tar balance watala aasata!
Dhanywad!

BHARAT RANJANKAR

Anonymous said...

Mast lihile aahe re. pan ajun kahi nirikshane nodvalya havi hoti. adchanichya velihi kawale ekmekana khup madat kartat. baki tuzya aaiche kam gr8 aahe.
- vishwanath

manasi said...

छान् लिहिले अहे
टुमच्या घरि नसेल् पन् आमच्या घरि कवल्यने
मन्सहरि पडार्थ अनुन टकले अहेत

Anonymous said...

bhari

Anonymous said...

i used it for school project.
thank you!!!!!!!!!!!!!!!!!!

Anonymous said...

only kawla ka????
azun kahi tari tak
chimney,kabutar,kokila,salunkiani mor!!!!!!1
plz i use for my school project!!!!