सहयोगी बातमीदार ब्लॉगवर सध्या मस्त शाब्दिक युद्ध रंगलंय. पवार कुटुंबीयांनी सकाळ वृत्तपत्र टेक ओव्हर करण्याच्या घटनेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सकाळमध्ये हृद्य सोहळा रंगला होता. सकाळने त्यादिवशी २५ लाख अंक छापून वितरीत करण्याचे आव्हानही लिलया पेलले होते. या पार्श्वभूमीवर सहयोगी बातमीदार या ब्लॉगवर अरुंधती पुणेकर यांनी लेख लिहून पवार कुटुंबीयांच्या कौशल्याचे तोंड भरुन कौतुक केले आहे.
ही तो पवारांची किमया...
त्यानंतर सकाळमधील एका माजी ज्येष्ठ पत्रकाराने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर लेख लिहिला आहे. यामध्ये अनेक मुद्यांना हात घातला असून काही ठिकाणी वाभाडेही काढण्यात आले आहेत. या लेखावरुन सकाळमध्ये पुरती खळबळ उडाल्याची सूत्रांची माहिती आहे. कोण असेल या ब्लॉगचा लेखक यावरुन सकाळमध्ये चर्चा व अंदाजांना उधाण आले आहे. एकीकडे मटाचे वादळ घोंघावत असताना ढासळत चाललेली तटबंदी वाचविण्यासाठी वरिष्ठांची धावपळ सुरु असल्याचे समजते. मटामध्ये मुलाखती देऊन आलेल्या कर्मचा-यांना तातडीने राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात आहे. तसेच सकाळनेच तुम्हाला मोठे केले, आता सोडून कसे जाऊ शकता, असे इमोशनल डायलॉग्ज मारले जात आहेत. त्यातच हा लेख प्रकाशित झाल्यामुळे बुधवार पेठेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळची पवार पंचविशी...
दोन्ही लेखांची जोरदार चर्चा पत्रसृष्टीत आहे. विशेषतः सकाळच्या आजी-माजी कर्मचा-यांमध्ये जास्तच. या दोन्ही ब्लॉग्जच्या लिंक्स खास माझ्या ब्लॉगच्या वाचकांसाठी.
धन्यवाद...
3 comments:
hehehehehe :)
थोडंफार सत्य सांगितलं आहे. जे की कुठल्याही कंपनीला लागु होतं. एवढा चर्चिला गेला लेख मला वाटले पेड न्य़ूज वगैरे प्रकरणावर प्रकाश टाकणारा लेख असेल. पण ही माहिती नविनच होती. धन्यवाद.
Aashish, direct attack!! Sakaal aani Lokmat yancha sampadakiya darja aani raajkiy hujregiri yaa goshi sodlyaa tar sarva kaahi aalbel aahe. Donhi vruttapatre tyaa babtit malkanchi kutri aahet. Congratulations.
Ravi Godbole
Post a Comment