प्रियांकाजी है टक्कर में
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या प्रचार फेरीत सहभागी झाल्यानंतर दुस-या दिवशी रायबरेलीला जाण्याचं प्लॅनिंग होतं. सातव्या टप्प्याचा प्रचार सोमवारी संपणार होता. तिथं बुधवारी म्हणजेत ३० एप्रिल रोजी मतदान आहे. त्यामुळं रायबरेलीला जाण्याचं निश्चित केलं. रायबरेलीतून सोनिया गांधी येणार ही काळ्या दगडावरची रेघ. पण तरीही तिथं जाऊन नेमकं रायबरेली कसं आहे. भारतावर ज्या महिलेनं दहा वर्षे निर्विवाद सत्ता गाजविली, हुकुमत केली, त्या सोनियांचा मतदारसंघ नेमका कसा आहे, हे पाहण्याची आणि परिस्थिती जाणून घेण्याची उत्सुकता होती. केवळ आणि केवळ त्यामुळंच तिथं जायचं होतं. बाकी निकाल तर ठरलेलाच आहे.

लखनऊतल्या आलमबाग बस डेपोतून रायबरेलील जाणा-या बसेस सुटतात. लखनऊपासून सुमारे नव्वद किलोमीटरवर असलेलं गाव. लखनऊमध्ये सध्या ३९ ते ४० अंश सेल्सियस तापमान आहे. पण उन्हाचा तीव्रता इतकी आहे की विचारता सोेय नाही. अकोला, वाशिम, नांदेड, जळगांव किंवा हैदराबादची आठवण यावी, इतकं कडक ऊन आहे. दुपारी साधारण पावणेबाराच्या सुमारास लखनऊ सोडलं. दुपारी दोन वाजता रायबरेलीत प्रियांका गांधी यांचा रोड शो होता. त्यामुळं अगदी वेळेवर तिथं पोहोचेन अशा बेतानं निघालो. लखनऊ-अलाहाबाद हायवेवर आत उजवीकडे वळल्यानंतर रायबरेली गाव लागतं. दोन पदरी महामार्ग आत्ता कुठं चौपदरी करण्याचं काम सुरू झालंय. वाटेत एक-दोन ठिकाणी नदीवर मोठे पूल बांधणं आणि गावात ट्रॅफिक जाम होऊ नये, म्हणून फ्लाय ओव्हर उभारण्याचं कामही सुरू आहे.

रायबरेली आणि परिसरातील गावात प्रचंड पाऊस होतो. त्यामुळं इथं धानाची म्हणजेच तांदळाची शेती मोठ्या प्रमाणावर होते. काही गावांमध्ये गहू देखील घेतला जातो. इथले जवळपास ८० टक्के लोक हे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहेत, असं बसमध्ये भेटलेले सहप्रवासी आणि माजी शिक्षक जयद्रथ चौधरी यांनी सांगितलं. सोनिया यांच्या कृपेमुळ इथं रेल्वे कोचची फॅक्टरी, सिमेंटची फॅक्टरी, सिमेंटचे पत्रे बनविणारी फॅक्टरी वगैरे आली, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. मात्र, शेती हाच इथला मुख्य व्यवसाय. सोनियाजींनी खूप निधी केंद्रातून आणला. मात्र, राज्य सरकारने पैसाच सोडला नाही. आमच्याकडे दुर्लक्श केलं, त्यामुळं रायबरेली अजूनही विकसित झालेलं नाही, असं चाचा चौधरी यांचं म्हणणं होतं. मोदीजी की लहर होगी, लेकिन यहा तो सोनियाजी को ही जीतना है, असं चाचा चौधरी यांच्यासह एसटीमध्ये भेटलेले आणखी दोन-तीन सहप्रवासी देखील म्हणत होते.

बछरावा, हरचंदपूर आणि गंगागंज वगैरे गावं मागं टाकून आम्ही रायबरेलीमध्ये प्रवेश केला. गावाचा लुक खेड्यासारखा. महाराष्ट्रातील एखाद-दुसरा तालुका सोडला तर इतर कोणत्याही विकसित तालुक्याच्या तुलनेत अत्यंत मागास, अस्वच्छ आणि विस्कळित असं गाव. म्हणजे गेल्या साठ वर्षांमध्ये गांधी घराण्यानं इथं राज्य केलं, असं सांगूनही कोणाचा विश्वास बसणार नाही, इतकी वाईट अवस्था रायबरेलीमध्ये दिसते. उघडी गटारं, मुंबईत खाडीच्या आसपास असताना नाकात घुसणारी नको असलेली दुर्गंधी इथं त्या उघड्या गटारांजवळ आपल्याला हैराण करणारी. प्रचंड तापलेले वातावरण, सगळीकडे प्रचंड तापमान आणि मधूनच येणारी ती दुर्गंधी अस्वस्थ करून टाकणारी. अरुंद रस्ते, एकावेळी दोन गाड्या कशाबशा जाऊ शकतील इतक्यात रुंदीचे हे रस्ते कम बोळ.
एकमेकांना खेटून उभारलेली घरं. त्याला ना आकार ना उकार.फक्त चार भिंती रचून वर छप्पर आणि समोर दरवाजा काढला की झालं घर, अशा पद्धतीचं बांधकाम. एसटी स्टँड तर अत्यंत घाणेरडा, छोटा आणि बेशिस्त स्वरुपाचा. चौकाचौकात फेरीवाले, हातगाड्यांवर सरबत, खाण्यापिण्याचे पदार्थ आणि इतर वस्तू विकणारे हातगाडीवाले. थोडक्यात म्हणणे सोनियांचा मतदारसंघ म्हणून मिरविणा-या रायबरेली जिल्ह्यातील मुख्य गावाची ही परिस्थिती तर इतर खेडोपाड्यांत आणि गावांमध्ये काय परिस्थिती असेल विचारायला नको.

नेत्रचिकित्सालया शेजारच्या कार्यालयातून प्रियांका वड्रा यांची रॅली निघणार असते. प्रियांकांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येनं जमलेले असतात. काँग्रेसचे रायबरेली जिल्हाध्यक्ष सईदुल हसन हे प्रियांकांचं स्वागत चौकाचौकात आणि व्यवस्थितपणे होईल, याचं नियोजन पाहत असतात. फुलं, हार, काँग्रेसच्या टोप्या, उपरणाी वगैरे सर्वांपर्यंत पोहोचली की नाही, याचा अंदाज घेऊन ते देखील प्रियांकांच्या स्वागतासाठी सज्ज होतात.
एवढ्यात जोरजोरात घोषणाबाजी सुरू होते आणि बरोब्बर अडीचच्या सुमारास प्रियांका वड्रा त्यांच्या टोयोटातून येतात. येतात ते थेट कार्यालयाच्या समोरच्या मैदानात त्यांची टोयोटा थांबते. आतमध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांशी दोन-तीन मिनिटांत संवाद साधून पुन्हा बाहेर येतात. कारमध्ये बसून प्रियांका यांनी रोड शो करावा, असा सिक्युरिटीचा आग्रह असतो. तशी विनंती देखील त्यांना केली जाते. प्रियांका गाडीत बसतात देखील. मात्र, मिनिटाभराच्या आतच गाडीतून बाहेर उतरतात आणि वेगानं चालतच तिथून मार्गस्थ होतात.

चार साडेचार किलोमीटरचा हा टप्पा चालतच पार करण्याचा निश्चय प्रियांका यांनी मनोमन केलेला असतो. त्या थेट रस्त्यावर उतरून स्वागतासाठी थांबलेल्या नागरिकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये शिरतात. हा रोड शो आता ना सिक्युरिटीच्या आवाक्यात राहिलेला असतो ना काँग्रेस कार्यकर्त्यांचा. सिक्युरिटी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचं कडं मोडून नागरिक आणि इतर लोक थेट आत घुसून प्रियांका यांच्याशी हस्तांदोलन करतात. त्यांना हार घालतात. त्याच्यावर फुलांची आख्खी टोकरी पालथी करतात. प्रियांका गांधी देखील चालताना थेट दुकानांमध्ये जाऊन उभ्या असलेल्या पुरुष मंडळींना नमस्कार कर, महिलांची गळाभेट घे, उभ्या असलेल्या लहान मुलाला कडेवर उचलून घे, कार्यकर्त्यांशी एक-दोन शब्द बोल... असं करून फुल्ल हवा निर्माण करतात. लोकांचा जत्थाच्या जत्था प्रियांका यांच्या सोबत पुढे चाललेला असतो. गांधी घराण्याची क्रेझ म्हणजे काय हे रायबरेलीतल्या रोड शो मध्ये अगदी व्यवस्थित पहायला मिळालं.

तीस तारीख दुसरा खाना, पंजेपर ठोक देना... किंवा क्यो पडते हो चक्कर में, प्रियांकाजी है टक्कर में... अशा घोषणा देत कार्यकर्ते फुल्ल टू वातावरण निर्मिती करीत असतात. रायबरेली की जनता का हाथ, सोनियाजी के साथ अशा घोषणाही अधून मधून कानावर पडत असतात. प्रियांकाजी आयी है, नयी रोशनी लायी है वगैरेही ऐकू येत असतं.

मुस्लिम मोहल्ला आल्यानंतर तर रोड शो तील जल्लोष, उत्साह आणि आनंद टिपेला पोहोचतो. प्रियांका यांचं सर्वाधिक जोरदार स्वागत सफा मंजिल की तत्सम कुठल्याशा बिल्डिंगपाशी होतं. मुस्लिम महिला त्यांना हात दाखवून हसत हसत अभिवादन करतात. प्रियांका देखील त्यांच्याकडे वर पाहतच पुढं जात राहतात. अत्यंत वेगानं चालणा-या प्रियांका थोड्या दमल्या तर कारच्या फूटरेस्टवर उभ्या राहून लोकांना हात हलवून अभिवादन करीत असतात. पण त्यांची ही छोटेखानी विश्रांती अवघी पाच मिनिटंच टिकते. नंतर त्या पुन्हा रस्त्यावर उतरून वेगानं मार्गस्थ होतात. काश्मिरी सौंदर्याचं जन्मजात वरदान लाभलेल्या प्रियांका यांचा चेहरा कडक उन्हामध्ये फिरताना सफरचंदासारखा लालबुंद होतो. मात्र, त्यांच्या उत्साहावर त्याचा अजिबात परिणाम होत नाही. त्या चालतच असतात.

संपूर्ण रायबरेली गावामध्ये फिरून झाल्यानंतर त्यांचं काँग्रेसचं रायबरेली मुख्यालय असलेल्या टिळक भवन इथं आगमन होतं. तिथंही त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली असते. अभय त्रिवेदी, रमाकांत पाण्डेय वगैरे कार्यकर्त्यांनी मोठाच्या मोठा गुलाबाचा हार प्रियांका यांच्यासठी आणलेला असतो. रोड शो संपवून प्रियांका यांचं काँग्रेस भवनात जोरदार स्वागत होतं. त्यांना हार वगैरे घातल्यानंतर प्रियांका फक्त पाच मिनिटांसाठी कार्यालयात जातात. ज्येष्ठ आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर मग त्या राज्य सरकारच्या गेस्ट हाउसवर निघून जातात.

प्रियांका वड्रा आणि गांधी घराण्याची जादू काय असते हे रायबरेलीमध्ये अनुभवायला मिळालं. अर्थात, रायबरेलीमध्ये हे चित्र असणार हे माहिती होतंच. मात्र, तरीही प्रियांका या नावाची जादू काय आहे, त्याची चुणूक जाणविली. राहुल यांच्या तुलनेत कितीतरी पटीनं अधिक लोकप्रिय आणि गर्दी खेचणारा चेहरा म्हणून प्रियांका यांच्याकडे काँग्रेसनं गांभीर्यानं पहायला हरकत नाही. अर्थात, यंदाची निवडणूक राहुल यांच्या नेतृत्वाखाली लढल्यानंतर प्रियांका यांचा हुकुमाचा एक्का काँग्रेसकडे अजूनही शाबूत आहे, याची जाणीव भाजपाच्या नेत्यांनी ठेवायला हरकत नाही. सोनिय गांधी परदेशाी आहेत, गांधी घराण्याने घराणेशाही लादली वगैरे कितीही आरोप झाले, तरी भारतात गांधी घराण्याची जादू आहे आणि ती यापुढेही शाबूत का राहू शकते, याचा अंदाज बांधण्यासाठी कोणा राजकीय विश्लेषकाची गरज नाही.
प्रियांका यांचे पती रॉबर्ट यांच्यावर भाजपने जोरदार हल्ला सुरू केल्यानंतर प्रियांका यांनीही अत्यंत संयतपणे मात्र, रोखठोकपणे नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. भारतात राज्य करायचं असेल तर ५६ इंचाची छाती असून उपयोग नाही, तर मन मोठं पाहिजे किंवा कसे घाबरलेल्या उंदरासारखे इकडे तिकडे पळत आहेत भाजपवाले... वगैरे वगैरे वक्तव्यांनी इथं माहोल निर्माण केला आहे. प्रियांका गांधी यांना काँग्रेसनं थोडं आधी आणि रायबरेली-अमेठी सोडून इतर मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी उतरविलं असतं तर भाजपच्या मिशन ५० प्लसला नक्कीच लगाम घातला गेला असता. पण कदाचित रिस्क नको आणि पुढील निवडणुकीपर्यंत पत्ते बंदच ठेवलेले बरे, अशा विचारात काँग्रेस नेते असावेत. म्हणूनच त्यांनी प्रियांकांवर दोनच मतदारसंघाची जबाबदारी दिली.

उत्तर प्रदेशात मोदींची हवा आहेच. जागा किती मिळतीत, हे आता ठोकपणे मी सांगू शकणार नाही. मात्र, रोज फिरताना ऑटोवाले, पाणीपुरीवाले, सरबतवाले, बसमधील सहप्रवासी अशा कोणालाही विचारलं तरी यंदा मोदीच आहे, असं उत्तर येतं. त्यामुळं कोणी काहीही म्हणो इथं फिरताना मोदीचा बोलबालाच ऐकायला मिळतो आहे. मात्र, भविष्यात प्रियांका गांधी यांच्या रुपानं भाजपसमोर तुलनेनं कठीण आव्हान उभं ठाकणार आहे, याची कल्पना रायबरेलीमध्ये आली. १९८९ ते २००४ या काळात गांधी घराणे सत्तेपासून दुूर होते. काँग्रेस संपली. गांधी घराणे इतिहासजमा झाले वगैरे गप्पा मारल्या जात होत्या. मात्र, त्याच काँग्रेसने आणि गांधी घराण्याने पुढची दहा वर्षे सत्ता उपभोगली. काँग्रेसने बाउन्स बॅक केले. त्यामुळे काँग्रेसला संपविणे वाटते तितके सोपे नाही. किमान प्रियांका गांधी हे चलनी नाणं उपयुक्त नाही, असे सिद्ध होईपर्यंत तर अजिबातच नाही.
भारतीय जनता पार्टीचे अजय अगरवाल रायबरेलीतून उभे आहेत. सुप्रीम कोर्टातील वकील आहेत. मात्र, सोनिया यांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. रायबरेली गावात तर भाजपचे झेंडे देखील कुठं दिसत नाहीत. संपूर्ण गावात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच झेंडे दिसले. रायबरेलीमध्ये भाजपचं ऑफिस कुठं आहे, हे दुकानदार, फेरीवाले, हातगाडीवाले, ऑटोवाले आणि बाजारात आलेले नागरिक यापेैकी कोणालाही माहिती नाही. सुपर मार्केट नावाच्या भागात एका इमारतीमध्ये भाजपचे कार्यालय आहे, याचा शोध साधारण तासभर शोध घेतल्यानंतर लागतो. गमतीची गोष्ट म्हणजे निवडणूक ऐन मोसमात आलेली असताना आणि मतदानाला फक्त दोन दिवस बाकी असताना भाजपच्या कार्यालयाला चक्के कुलूप लावलेले दिसते. असाच अनुभव गुजरातच्या निवडणुकीत सुरत आणि वडोदरा येथील काँग्रेस कार्यालयांमध्ये आला होता. एक बंद होतं तर दुसरीकडं शुकशुकाट.
भाजपच्या उमेदवारानं दुसरीकडे कुठेतरी कार्यालय थाटल्याचं समजतं. मात्र, तरीही रायबरेली जिल्हा कार्यालय बंद असल्याचं समर्थन कोणीच करू शकणार नाही, अशी परिस्थिती. हिरालाल बैन्सवाल नावाचे एक साठीकडे झुकलेले भाजपाचे कार्यकर्ते भेटतात. ते दोन वर्षांपूर्वी भाजपामध्ये आले होते. त्यांनाही नव्या कार्यालयाची माहिती नसते. ते त्यांच्या परीने शोधाशोध करून मुख्यालय उघडता येईल का, याचा प्रयत्न करतात. मात्र, मुख्यालय बंदच असते. अजय अगरवाल यांच्याशी फोनवरून बोलणं होतं. ते दुस-या गावांमध्ये प्रचार संपवून रायबरेलीच्या दिशेनं यायला निघालेले असतात. मात्र, मला लखनऊ गाठायचं असल्यानं मी फोनवरच त्यांचा निरोप घेतो आणि शुभेच्छा देऊन निघतो...