Wednesday, August 19, 2009

"साम मराठी'ची वर्षपूर्ती...

कार्यकर्त्यांमुळे साकारतेय "साम राज्य'...

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारत... क्रिकेटमध्ये सध्याच्या युगातली ही दादा मंडळी. पण न्यूझीलंडचा संघ या दादा मंडळींमध्ये कधीच मोडला जात नाही. तरीही कायम तो संघ विजेतेपदाच्या स्पर्धेत असतो. चॅंपियन्स करंडक स्पर्धा जिंकण्याची कामगिरीही त्यांनी एकदा करुन दाखवलीय. त्यांच्याकडे सचिन तेंडुलकरसारखा "स्टार प्लेअर' नाही, वॉर्न-मुरलीप्रमाणे फिरकी गोलंदाज नाही, पॉटिंग-कॅलिस सारखे फलंदाज नाही. पण न्यूझीलंडच्या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अष्टपैलू खेळाडू, त्यांचं क्षेत्ररक्षण, खेळातलं सातत्य आणि संघासाठी प्रत्येकाचं काही ना काही योगदान. हा संघ ऑस्ट्रेलियासारखा जगज्जेता नसेल पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करुनही चालत नाही. असंच काहीसं "साम मराठी' वाहिनीचं आहे. विशेषतः बातम्यांचं!

पण गेल्या वर्षी जेव्हा वाहिनीची सुरवात झाली तेव्हा परिस्थिती अशी नव्हती. "साम जन्मला गं सखी साम जन्मला...' अशा प्रतिक्रियांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या आसपास "साम मराठी' या वाहिनीचं स्वागत झालं होतं. अर्थातच, माध्यमातल्या बऱ्याच जणांनी स्वागत करताना नाकं मुरडली होती किंवा त्यांची या बाळाबद्दल फारशी चांगली प्रतिक्रिया नव्हती. "सकाळ'सारख्या ग्रुपकडनं त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. ही गोष्ट बरेच जणांनी बोलून दाखविली होती. कारणही तसंच होतं. काहीच महिन्यांपूर्वी म्हणजेच गुढीपाडव्याला "आयबीएन लोकमत' या वृत्तवाहिनीचं आगमन झालं होतं. त्यामुळं सकाळची "साम' आणि "आयबीएन लोकमत' यांच्यात तुलना होणं साहजिकच होतं. अशा परिस्थितीत "साम'वरचे कार्यक्रम आणि इतर घडामोडी यामुळं ""...उचललेस तू मीठ मूठभर, "साम्राज्या'चा खचला पाया...'' असं म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. अर्थातच, सुरवातीच्या काही महिन्यातच!

आमच्याकडे राजदीप सरदेसाई किंवा निखील वागळे यांच्यासारखा चेहरा सेल, "आयबीएन', "स्टार' किंवा "झी'सारखं नेटवर्क नसेल, "टाइम्स नाऊ' किंवा "नेटवर्क 18' इतक्‍या "ओबी व्हॅन' नसतील. पण तरीही आमची बातमी चुकत नाही. बातमीचा क्रम चुकलाय असं कधी झालं नाही. सोयी-सुविधांची फारशी रेलचेल नसतानाही आम्हाला कशाचीच उणीव भासली नाही. ना राज ठाकरे यांच्या मराठीच्या आंदोलनावेळी, ना 26 डिसेंबरच्या हल्ल्यावेळी, ना लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण टप्प्यात. काठोड्याचं बलात्कार प्रकरण असो किंवा हासेगावच्या एड्‌सग्रस्त विद्यार्थ्यांची ससेहोलपट साम मराठीनं प्रथम प्रकरणाला वाचा फोडली आणि नंतरही वेगवेगळ्या स्तरावर हे मुद्दे लावून धरले. निरनिराळ्या वृत्तमालिका झाल्या. "सकाळ'च्या संस्कृतीपेक्षा थोडीशी हटके भूमिका घेत "साम'नं कायम आक्रमकपणे बातम्या दिल्या. मग पद्मसिंह पाटील यांच्या अटकेची बातमीही "राष्ट्रवादी'वर आसूड ओढणारी होती. "राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दहाव्या वर्धापनदिनी पद्मसिंह पाटलांच्या हकालपट्टीची पक्षावर नामुष्की...' अशा मथळ्याची बातमी "सकाळ'मध्ये आली असती का? पण हीच हेडलाईन आणि बातमीचा हाच टोन "साम'वर होता. त्यामुळं आम्हीही आता आमचा टक्का निश्‍चित केला असून तो वाढवत नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

कोणी काहीही म्हणत असलं तरी आता "साम मराठी' बऱ्यापैकी स्थिरावलीय. राज ठाकरे यांचं मराठीच्या मुद्‌द्‌यावरचं आंदोलन असो, "एन्ट्री पोल', "मी महाराष्ट्र बोलतोय...' किंवा "लोकसभा ट्‌वेंटी-20' सारखे निवडणूक विषयक कार्यक्रम असो, "साम'च्या वृत्तविभागानं बऱ्यापैकी मायलेज मिळवलं आहे. अगदी सुरवातीच्या काळात तर राजू परुळेकर यांनी घेतलेल्या "महाराष्ट्र कोणाचा' या कार्यक्रमामुळं "साम'ची बऱ्यापैकी प्रसिद्धी झाली होती. तसंच टोकदार, आक्रमक पण इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे उथळपणा न करता बातम्या देण्याचं काम "साम मराठी'चा वृत्तविभाग करतोय. त्यालाही हळूहळू प्रतिसाद मिळतोय. ""तुमच्या बातम्या वेगळ्या असतात. इतरांकडे त्याच त्याच बातम्या दाखवितात. तुमच्याकडे मात्र, तोच तोच पणा येत नाही,'' अशा प्रतिक्रिया प्रेरणादायीच म्हटल्या पाहिजेत. बाकी "टाटा स्काय' किंवा "डिश'वर साम दिसत नाही. ही खंत आहेच. पण हे जेव्हा घडेल तेव्हा "साम'ची घोडदौड खऱ्या अर्थानं सुरु होईल.

"झी 24 तास', "स्टार माझा' आणि "आयबीएन लोकमत' यांच्याकडचं मनुष्यबळ, वार्ताहरांची संख्या, उपलब्ध तंत्रज्ञान, सुविधा आणि हिंदी किंवा इंग्रजी वाहिन्यांकडून मिळणारा "सपोर्ट' या सर्वच गोष्टी लक्षणीय आहेत. म्हणजेच या गोष्टींमध्ये "साम'ची तुलना इतर मराठी वाहिन्यांशी करता येत नाही. पण तरीही "साम'च्या बातम्यांचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार झाला आहे. ही गोष्ट वारंवार स्पष्ट झालीय. "आयबीएन' वाहिनी दोन्ही "डीटीएच'वर जाण्यापूर्वी "आयबीएन' वाहिनीपेक्षा "साम'चा "जीआरपी' (ग्रॅंड रेटिंग पॉईंट) प्रत्येक आठवड्याला अधिक असायचा. इतकंच काय तर लोकसभा निवडणुकीच्या दिवशी "एनडीटीव्ही' आणि "साम' वाहिनीच्या प्रेक्षकांची टक्केवारी जवळपास सारखीच होती. "एन्ट्री पोल'च्या प्रश्‍नमंजुषेच्या उत्तरासाठी रोज जवळपास हजारहून अधिक "एसएमएस' यायचे. थोडक्‍यातच सांगायचं झालं तर "साम'ची लढाई अस्तित्वासाठी सुरु नसून अधिकाधिक वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी सुरु आहे. "मी मराठी'च्या बातम्यांशी तुलना करण्याची माझी इच्छा नाही. पण अनेकदा आमच्या बातम्या, आमचा लुक "झी 24 तास'पेक्षाही चांगला असतो. असो.
वैयक्तिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर "इनपुट हेड' किंवा "प्रोड्युसर' म्हणून काम करताना खूप मजा आली. कामातला आनंद इतका होता की त्याचा कधी कंटाळा आलाच नाही. स्वतंत्र विचार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं स्वातंत्र्य इथं आहे. त्यामुळं काम करताना मिळणारा आनंद खरोखरच अवर्णनीय आहे. इतरांना हेवा वाटावा, असा मराठी वृत्तवाहिन्यांमधला क्रमांक एकचा "डेस्क' आज "साम मराठी'कडे आहे. अनुभवी आणि धडपड्या रिपोटर्सची "टीम' आमच्याकडे आहे. "बॉसिंग' न करणारे "साहेब' आमच्याकडे आहेत. नवं काहीतरी शिकण्याची जिद्द असणारे "कार्यकर्ते' आमच्याकडे आहेत. त्यामुळंच "डेस्क'चं काम सांभाळून रिपोर्टिंग करणारे, गरज पडली तर पॅनेल प्रोड्युसिंग करणारे "कॉपी एडिटर' किंवा "बीपी' साममध्ये आहेत. एखाद्या "एपिसोड'साठी दोन-दोन दिवस ऑफिसमध्ये तळ ठोकून बसणारी मंडळी आहेत. या सर्वांच्या जोरावर हा "साम'चा गाडा ओढला जातोय. रिपोर्टिंग, कॉपी एडिटिंग, स्पेशल प्रोग्रॅमचं प्लॅनिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा "व्हीओ' असं काहीही असलं तरी "कार्यकर्ते' सदैव तयार असतात.

शिवरायांचं स्वराज्य जसं मावळ्यांच्या जोरावर घडलं तसंच हे "साम राज्य' कार्यकर्त्यांच्या जोरावर घडतं आहे. अडचणी आहेत. संकटं येणार आहेत, हे देखील माहिती आहे. पण त्याचबरोबर एक सुंदर "एसएमएस'ही आम्हाला माहिती आहे. तो "एसएमएस' असा...
As we sail through life, don't avoid storms and rough waters. Just let it pass. Sail On and Sail On. Just because calm seas never make skillful sailors...

26 comments:

दुर्गेश सोनार said...

साम राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा... कार्यकर्त्यांच्या बळावरच कोणतंही साम्राज्य उभारतं हा इतिहास आहे आणि असा इतिहास घडवण्याची क्षमता असलेले कार्यकर्ते आपल्याकडे आहेत, ही आपली जमेची बाजू आहे... त्यामुळे कुणीही कितीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तरी साम राज्याची पताका दिमाखात फडकत राहणार हे निःसंशय...

Anonymous said...

सर्व सहकार्‍यांच्या अगदी मनातली गोष्ट आशिषनं लिहिलिय. आव्हान पेलण्यात मजा असते, नशा असते. ती आपण अनुभवतोय, सेलिब्रेटही करतोय. तांत्रिक अडचणींवर मात करतोय. उत्तम चालूय... अजून प्रयत्न करूयात. ज्याचं नाणं खणखणीत वाजतं, त्याच्याबद्दल नेहमी कौतुकाचेच बोल उमटतात. थ्री चिअर्स फॉर साम न्यूज....

अमोल परांजपे said...

मस्त रे... एकदम सही.. गेल्या वर्षभरात आपण खरंच चांगलं काम केलंय. आपली टीमच मस्त झालीय. आणि टीम चांगली असेल तर सामना न जिंकायला काय झालं... काही ओव्हर्स खराब जातात... कधी लवकर विकेट पडतात... पण चलता है! आपण अजून कुठलीच लढाई हारल्याचं मला आठवत नाहिये. आपल्याला उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीत आपण उत्तमोत्तम आऊटपूट देत आलोय. बाकीचे चॅनल्स आपल्यापेक्षा तांत्रिकदृष्ट्या इतके सक्षम असूनही आपण अनेकदा 'स्कोअर' केलाय, तो आपल्या टीमवर्कच्या जोरावर...
तुला आठवत असेल, अहमदाबादचे ब्लास्ट झाले तेव्हा आपण एअरवर नव्हतो... पण त्यावेळीही आपण ड्राय रनमध्ये १५ मिनिटांच्या शॉर्ट टर्म नोटीसवर चांगलं बुलेटीन काढलं होतं. (अर्थात त्यावेळी मी नव्हतो तिथं... नंतर सगळ्यांकडून समजलं) त्याच वेळी आपला विषय झाला होता आपल्या टीमबाबत... आपला डेस्क सगळ्यात तगडा आहे, हे तेव्हाच आपल्याला समजलं होतं. ते आपण गेल्या वर्षभरात सिद्ध केलंय...
आपले रिपोर्टर्स चांगले असले तरी संख्येनं कमी आहेत, हा आपला मोठा ड्रॉबॅक आहे. तो दूर झाला... किमान दोन ओबी व्हॅन आल्या... १ एमबीच्या ऐवजी किमान पुणे-मुंबई-दिल्लीतून बेलापूरला २ एमबीची लाईन मिळाली... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण डीश टीव्हीवर गेलो तर आपण खरोखर आपलं 'साम्राज्य' उभं करू... पण सध्याही नॉट बॅड...
सगळ्या टीमच्या वतीनं प्रॉमिस की, वूई विल कीप इट अप...

Anonymous said...

Congrats to you for milestone number 1. Many of the great achievements of the world were accomplished by tired and discouraged men who kept on working, they say.

I appreciate good articulation of this article of yours, yet shrewd way of publicity though. Keep it up!

Anonymous said...

chhan aahe re blog... yogya aani vastusthiti mandali aahes.. good..!!

wish u good luck

regards,
Deepak Darade...

Anonymous said...

Ashish,

Woods r lovely, long and deep
But U hv promises to keep
miles to go before u sleep
miles to go before u sleep

All the Best

Unknown said...

Namskar saheb...SAAM MARATHI la lakh lakh shubhechya...blog chan hota..ashich SAAM MARATHI pragati karat raho..tula tuzya team la congrats...

allinfo said...

अभिनंदन !!!!
साम वाहिनीने वर्ष पूर्ण केल्याबद्दल.

don compare wid other channels,compare wid urself only.

news which are broadcasting r really good.

Congrats n Best wishes for long journey.

विजयसिंह होलम said...

श्री. चांदोरकरजी,
आपल्या या लेखातून आपण "साम'चे साम्राज्यच उलगडून दाखविले आहे. एका मराठी वाहिनीची वर्षभराची ही कौतुकास्पद वाटचाल कोणालाही हेवा वाटावी अशीच आहे. आपल्यासारख्यांच्या प्रयत्नांतून (आपल्या भाषेत कार्यकर्ते) "साम'चे भवितव्यही उज्ज्वल आहे यात शंका नाही. एका वाहिनीच्या कामकाजात किती प्रयत्न करावे लागतात, याची जाणीव आपली पोस्ट वाचून झाली.
परंतु कोणत्याही वाहिनीची तुलना वृत्तपत्रांशी करणे खटकणारे आहे. "सकाळ' आणि "साम' एकाच परिवारातील असले तरी भिन्न माध्यमं आहेत. एका ठिकाणी आपण म्हटले आहे की, "सकाळ'च्या संस्कृतीपेक्षा थोडी हटके भूमिका घेत......' पण अलिकडे "सकाळ'नेही हटके भूमिका घेण्यास सुरवात केली आहे, याचा अनुभव आपण घेत आहोतच. म्हणूनच प्रींटमधील अग्रस्थान टिकून आहे. पद्‌मसिंहाच्या बातम्यांचेच उदाहरण द्यायचे झाले तर तेथे "सकाळ' अजिबात तडजोड केलेली नाही. अटकेपासून निलंबन आणि त्यापुढील इतर घडामोडींच्या बातम्याही "सकाळ'ने मेनच केल्या आहेत., असो. (उत्तर देण्याचा हा प्रयत्न नाही. सहज सूचले म्हणून लिहित आहे.) सामचे साम्राज्य असेच वाढत राहो, याच शुभेच्छा!

दीपक २२कर said...

नेते छान...न्युझीलंड टीमने विश्वचषक कधीही जिकंला नसेल.. पण साम मराठी (टीआरपी नावाचा) विश्वचषक नक्की जिकंणार...कारण पहिल्या २०-२० विश्वचषकात भारतीय टीमला २०-२० सामन्यांचा कुठलाही अनुभव नव्हता... तरीही टीमच्या कामगिरीच्या जोरावर विश्वचषक जिकंला... सामची टीम सुध्दा तशी कामगिरी नक्की करेल

BANDU said...

सामची "न्युझीलंड" टिम झिंदाबाद... अरे खुप चांगलं काम करताय तुम्ही.

sagar said...

नेते साम मराठी खरोखरचे डार्क हॉर्स आहे. छोट्यामोठ्या रेसेसममध्ये आपण अव्वल स्थानी आहोतच. पण आता जॅकपॉटकडे लक्ष दिलं पाहिजे. अर्थात तुमच्यासारखा जॉकी असेल तर काहीच अवघड नाही...

Anonymous said...

साम मराठी को खड़ा करने में जिनका खून बहा है, जिन्हें अपना भरा-पूरा कैरियर को कुर्बान करना पड़ा..उनकी भी चर्चा एक पोस्ट में करें तो बेहतर हो। दिल्ली में 13 लोग संजीव लाटकर की तानाशाही के चलते बेरोजगार हुए। जबकि कंटेट सबसे बेहतर वही लोग देते थे। मराठी का एक प्रसिद्ध पत्रकार अपनी सरकारी नौकरी को छोड़कर साम के साथ जुड़ा, उसे भी लाटकर एंड कंपनी ने अलग किया.. उस पर भी चर्चा करें तो अच्छा हो।

Anonymous said...

प्रशंसा नेह्मी दुस्र्यानी करावी... अहो इथे तर तुम्ही स्वतःच स्वताचा मोठेपणा गात आहात ... पवारांच्या खेम्यात असेच आहे का?

Anonymous said...

सर्वप्रथम तुम्हाला हार्दीक शुभेच्छा....पण एकदा टी.आर.पी रिपोर्टर पहावा. आपण डिशवर नाही सुरवातीला एनेक चॅनल वेगवेगळ्या डिशवर दिसत नव्हते तरीही त्यांनी स्थान निर्माण केलं. हिंदी किंवा इंग्रजी चॅनल चा बॅकअप अनेकांना मिळतो पण वृत्तसंस्थांचा बॅकअप तुम्हाला मिळत नाही का...मुंबईतल्या बातम्या फक्त रिपोर्टर्स कमी म्हणून "मिस" होतात का हाही प्रश्न आहे, मला तुलना करायची नाही सर्व मराठी वाहिन्यांना चांगले दिवस यावेत हीच इच्छा आहे..

Anonymous said...

नेते झकास, लेख जबरदस्त आहे. कार्यकर्त्यांना आस असते ती फक्त पाठीवर पडलेल्या एका कौतुकाच्या थापेची. आपला वरिष्ठ ते करायला विसरत नाही हा अनुभ घेणं हाच सर्वात मोठा अनुभव.. सामच्या डेस्कविषयी बोलायचं तर ज्या ऑफिसमध्ये येताना आनंद वाटतो, ज्या ऑफिसमध्ये येताना कोणत्याही प्रकारचं दडपण येत नाही, ज्या ऑफिसमधून घरी गेल्यावर चिडचीड होत नाही, ज्या ऑफिसमधून घरी गेल्यावर ऑफिसमध्ये घडलेल्या गोष्टी आठवाव्याशा वाटतात.. ते ऑफिस म्हणजे साम मराठीचा न्यूज डेस्क... प्रगतीचा हाच खरा मार्ग आहे असं मला वाटतं नेते...जाता जाता अजून एकर गोष्ट सांगतो.. टीआरपीची काळजी मार्केटींग टीमला करूदे.. आपण त्याकडे नको लक्ष देऊया. कारण टीआरपी आणि क्वालिटी यांचा एकमेकांशी फार काही संबंध आहे असं नाही...


अमित भिडे

भातु संवाद विषयी... said...

सुखलाल
सर खरच म्हसेत....मी एवढेच म्हणेन....

prashant.anaspure said...

नेते, साम राज्यातल्या कार्यकर्त्यांचं बळ आणखी वाढेल, यात शंका नाही.

deepak homkar said...

very nice blog sir...
saam rajychi team N.Z. asel tar ya team cha me daniel flyn nakkich banel. vayan an expireans ne jasa to team madhe lahan asala tari nakkich madhali fali ch bharawashacha falandaj tharao. pawar saheb aso wa shinde saheb cameraman nastanai tyanchi laine up pakdun wikect n jata bating keliy adhun madhun chouke chake chalu ahet bt he saar tumhi kelely sahakaryamul ani blog madhe lihilelypramane bossing n karanary sahebanmul. nz kade over madhe 4 chakke marun world cup khishat taknara kapil sarakha caption nasel bt tumchya rupan amchykad to ahe mhanun pratek buletin na dhamakedar chake aapn karu shakato tyamule ek divas aapan world cup jinku yaat shanka nai.
pudchay news chya tayarila lagato,
har har mahadev.....

deepak homkar said...

very nice blog sir...
saam rajychi team N.Z. asel tar ya team cha me daniel flyn nakkich banel. vayan an expireans ne jasa to team madhe lahan asala tari nakkich madhali fali ch bharawashacha falandaj tharao. pawar saheb aso wa shinde saheb cameraman nastanai tyanchi laine up pakdun wikect n jata bating keliy adhun madhun chouke chake chalu ahet bt he saar tumhi kelely sahakaryamul ani blog madhe lihilelypramane bossing n karanary sahebanmul. nz kade over madhe 4 chakke marun world cup khishat taknara kapil sarakha caption nasel bt tumchya rupan amchykad to ahe mhanun pratek buletin na dhamakedar chake aapn karu shakato tyamule ek divas aapan world cup jinku yaat shanka nai.
pudchay news chya tayarila lagato,
har har mahadev.....

Yogesh Brahme said...

Ashish,
Mast blog lihila aahes. Of course, tuzya itar blogs pramane ch ha sudhda 'Vachneey' zala aahe. Saam chya batmya nakkich marathi news channels madhe far varchya darjachya aahet.
All the best to you and your team for more and greater succeses ahead!!!

anilpaulkar said...

Saam chy pragatit aslelya Laturchya watyache ullekh kelyabaddal Dhanyawad...yahi pudhchya kalat aamhi saam chya pragatisathi praytnshil rahu..

Anil Paulkar,
Reporter,
Latur

अमित चिविलकर said...

आशिषजी

सामचा सहजपणातून हृदयाला हात घालते हेच तुमच्यासाठी सर्टीफिकेट आहे बस्स! आणि जास्त काही म्हणने नाही.

Anonymous said...

Kahitarich kay? Kay murkhapana chalavla? Kon bhaghatay Saam? Balaji tambechi tape kivha bayaka. Saamcha kharch kahar nahi. Ugach swatchi XXXX lal karun kay fayada? Utha ani ata tari jage vha. Jara Market kade lakshya dya.

Unknown said...

hey
I like your article
But As a third person I am not agree with you.
Now a days
Sam is a good news chaneel
No doubt at all.
I aprrecaite on that
But I think Yoyu have started it as an entertainment chaneel
What about That?
Now you have nothing other than news
Only Publishing Balaji tambe.
What about that
please think on it
Yesteryear at the same time I have written article on your channel.

http://batmidar1.blogspot.com/2008/12/blog-post_03.html
I apolige for that
But just think
You have done proggrame on our Ambabai .
I apprecaite
But quality was not enough
You can surely take good people like Manish Apate for that
& only showd interviews of NCP people on your Maharashtrache man ( apavad-raj & udhav)
why all this
PErsonaly I like your writings ,I anm your fan
Written all this as friend
Keep it up
Best luck to all
vinayak
editor,
www.rangkarmi.com

Anonymous said...

Thanks :)
--
http://www.miriadafilms.ru/ приобрести фильмы
для сайта ashishchandorkar.blogspot.com