शब्द सुंदर तेथे राम... This place is to know various aspects that i present through my various news and articles.
Sunday, April 18, 2010
`मोदी`केअर
आयपीएलचा `गॉ़ड`
आयपीएलच्या निमित्ताने सध्या जे अकांडतांडव केले जात आहे, त्याचा केंद्रस्थानी आहेत शशी थरुर आणि ललितकुमार मोदी. पण आता हा केंद्रबिदू ललितकुमार मोदी यांच्या दिशेने सरकला असून मोदींना टार्गेट करण्यासाठीच हे सुरु आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यानिमित्ताने कोण आहेत हे ललित मोदी हा मुद्दा पुढे आलाय. तमाम हिंदुस्थानींना वेड लावणा-या आयपीएलचे ते आयुक्त आहेत. पण मोदी यांची आयपीएलचे आयुक्त ही ओळख अगदीच त्रोटक असून ती मोदी यांच्या एकूण कायॆ कतृत्त्वाच्या दहा-वीस टक्केही नाहीत.
हिंदुस्थानमधल्या मोदी एंटरप्रायजेस या चार हजार कोटी रुपयांच्या उद्योग समूहाचे अध्यक्श आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. साबण, शॅम्पू आणि विविध सौंदयॆवधॆक उत्पादने बनविणारी मोदी केअर ही कंपनी ललित मोदींचीच. फोर स्क्वेअर ही भारतातील सुप्रसिद्ध सिगारेट बनविणारी गॉडफ्रे फिलीप ही कंपनीही मोदींचीच. मोदी त्याचे कायॆकारी संचालक. इतकंच नाही तर शेती उत्पादने, स्टील, तंबाखू, चहा आणि शिक्शण अशा पाच-पन्नास गोष्टींचं उत्पादन करणा-या कंपन्यांचे मोदी हे सर्वेसर्वा आहेत.
ईएसपीएन या क्रीडा वाहिनीला भारतात आणण्याचं सारं श्रेय मोदींनाच जातं. ईएसपीएनवर क्रिकेटच्या सामन्यांचं थेट प्रक्शेपण व्हावं आणि क्रिकेट त्यांच्या अजेंड्यावर यावं, यासाठी पाठपुरावा करणारे ललितकुमार मोदीच. आयपीएल सुरु करण्यामागचा मेंदूही मोदींचाच. हिंदुस्थानमध्ये क्रिकेटमध्ये सोन्याची खाण आहे. जितकं काढू तितकं कमी. क्रिकेटमध्ये किमान दोन हजार कोटी रुपयांचा धंदा आहे, हे मोदींनी खूप वरषांपूऱ्वीच सांगितलं होतं. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना केवळ रुपयांमध्ये मानधन मिळू नये. तर फुटबॉलपटू किंवा अमेरिकी बास्केटबॉलपटूंप्रमाणे डॉलरमध्ये त्यांनी खेळावं, ही मोदींची इच्छा. त्यासाठीच मोदींनी आयपीएल अस्तित्वात आणली. वास्तविक पाहता १९९० च्या दशकांतच त्यांनी कमी षटकांच्या सामन्यांची योजना मांडली होती. पण बीसीसीआयनं ती बासनात गुंडाळून ठेवली.
पुढे मोदी मोदींनी राजस्थान क्रिकेट परिषदेवर गेले. तिथे अध्यक्श बनले. जगमोहन दालमिया यांच्याविरोधात शरद पवार यांना साथ देऊन मोदी पवारांच्या गुडबुकमध्ये गेले. बीसीसीआयचे ते सवात तरुण उपाध्यक्श बनले. मग शरद पवार यांनीही त्यांना आयपीएलचे आयुक्त करुन मदतीची परतफेड केली. आयपीएलचे आयुक्त म्हणून गेल्या वषीच्या पहिल्या सहा महिन्यांतच आठ कोटी रुपयांचा कर भरणारे मोदी हे वषॆभरात सवाॆधिक कर भरणारे हिंदुस्थानी ठरले. हिंदुस्थानातील पहिल्या तीस प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. फटकळ स्वभावामुळे आणि त्यांच्या कायॆशैलीमुळे मोदी हे फार काळ कोणाच्या फ्रेंडलिस्टमध्ये राहत नाहीत. असे असले तरी मोदी हे कुशल व्यवस्थापक म्हणून ओळखले जातात. गेल्या वषी हिंदुस्थानात निवडणुका असल्यामुळे दक्शिण आफ्रिकेत आयपीएल भरवून त्या तितकीच लोकप्रिय झाल्या. मोदींची कायॆकुशलता सिद्ध करण्यास इतकेच उदाहरण पुरेसे आहे. त्यांना कायम प्रसिद्धीच्या झोतात रहायला आवडते.
अशा या चौफेर वावर असणा-या मोदींना सध्या झेड प्लस सुरक्शा आहे. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे मोदी सध्या पंचवीस-तीस कमांडोंच्या गराड्यातच वावरतात. मोदी आयपीएलचे आयुक्त म्हणून राहिले किंवा नाही राहिले तरी क्रिकेटचं स्वरुप बदलून टाकणारा द्रष्टा म्हणूनच त्यांची ओळख राहिल.
मोदींच्या क्रीडा
ललितकुमार मोदींना लहानपणी शाळेत जायला आवडायचे नाही. त्यामुळे ते शाळा सुरु असताना मधूनच पळून जायचे. पण शालेय शिक्शणानंतर त्यांनी अभ्यासावरच लक्श केंद्रीत केले. अमेरिकेत शिकताना त्यांना अंमली पदाथॆ जवळ बाळगले म्हणून शिक्शा झाली होती. तसेच अपहरणाचा गुन्हाही त्यांच्यावर होता. त्यांना दोन वषांची शिक्शाही ठोठावण्यात आली होती. पण नंतर ती माफ करण्यात आली.
मोदी आणि थरुर
ललित मोदी आणि शशी थरुर यांच्यात गेल्या वषी पार पडलेल्या आयपीएलवेळीच ठिणगी पडली. मिस आयपीएल बॉलिवूड या स्पधेत गॅब्रिएला दिमित्रीएड ही ललना सहभागी झाली होती. खरं तर तीच स्पधेची विजेती झाली असती. पण मोदींचे आणि तिचे संबंध चांगले नव्हते. म्हणूनच ती जिंकली नाही, अशी चचा होती. तिला हिंदुस्थानात येण्यासाठी व्हिसा देऊ नये, अशी विनंती मोदी यांनी थरुर यांना जानेवारी २०१० मध्ये केली. पण थरुर यांनी विनंती अव्हेरली आणि तिला गॅब्रिएलाला व्हिसा दिलाच. तेव्हापासून मोदी-थरुर यांच्यात अधिक कटुता निमाण झाल्याची चचा आहे.
((सामनाच्या रविवार दिनांक १८ एप्रिल २०१० च्या अंकात वरील लेख प्रसिद्ध झाला आहे.)
Friday, April 16, 2010
दखल घेतली आणि विषय थांबला...
भाजीवाल्याचा वडा...
गेल्या काही दिवसांपासून भाजीवाल्याचा झाला वडा... ही मालिका या ब्लॉगच्या माध्यमातून लिहित होतो. वास्तविक पाहता, ही कथा कोणा एकावर बेतलेली नव्हती. ती कोणाला उद्देश्यून किंवा कोणाला टारगेट करण्यासाठी लिहिली होती, असेही नाही. पण तरीही काहींना ती आपलीच कथा आहे असे वाटत होते. त्यामुळे कथा थांबविण्याची विनंती वजा सूचना उणे धमकी गुणिले सल्ला मिळाला. या कथेतून कोणालाही काहीही सांगायचे नसले तरी त्यातून ज्यांना काही बोध घ्यायचा होता त्यांनी तो घेतला, असावा असे दिसते. योग्य त्या माणसांकडून योग्य ती दखल घेण्यात आली आहे आणि कदाचित भविष्यातही घेण्यात येईल, असे वाटते. त्यामुळे सध्या तरी भाजीवाल्याचा झाला वडा... ही कथा येथेच थांबवित आहोत. सदूचे कॉस्टकटिंग, गुणा जोशी, वड्याचे लाँचिंग (...रिलँचिंग) यासह अखेरीस भाजीवाल्याचा झाला -वडा- असे भाग लिहून तयार आहेत. पण योग्य त्या व्यक्तींनी योग्य ती दखल घेतल्यामुळे हे भाग सध्या तरी प्रकाशित होणार नाहीत. भविष्यात वेळ पडलीच तर योग्यवेळी आणि योग्य माध्यमातून ही कथा सुरु करता येईल. पण निश्चित असे काही नाही.
राहता राहिली गोष्ट माझ्यावर झालेल्या आरोपांची, तर जे स्वतःचं नाव गुलदस्त्यात ठेवून अनामिकपणे प्रतिक्रिया नोंदवितात त्यांनी आपले चंबू गबाळे आवरावयास घ्यावे. अशा लोकांच्या प्रतिक्रियांकडे ढुंकूनही पाहण्याची गरज नाही. पाठीमागून वार करणा-यांच्या अवलादीकडे लक्श देणार नाही आणि समोरुन वार करणा-यांना सोडणार नाही, अशीच भूमिका असते आणि राहील. त्यामुळे अशा लोकांना, अनामिकांना अशा प्रकारच्या कथा लिहिण्यामागचा हेतू किंवा इतर गोष्टींचा अथॆ समजण्याइतकी त्यांची व्यापकता नाही. मनाची तर नाहीच नाही. असो...
सध्या तरी इतकंच भेटूया लवकरच नव्या ब्लॉगसह... तोवर धन्यवाद.

Subscribe to:
Posts (Atom)