Tuesday, February 15, 2011

नवा बातमीदार

नाकाला पुन्हा मिरच्या झोंबणार

मराठी वृत्तपत्रसृष्टीत पत्रकारितेवर भाष्य करणाऱ्या, टीका करणाऱ्या आणि लोकांचे वाभाडे काढणाऱ्या ब्लॉगची परंपरा आणखी एक पाऊल पुढे गेली आहे. लेट्स भंकस, कळते-समजते, सहयोगी बातमीदार, फेकिंगन्यूज-ब्रेकिंगन्यूज आणि इतर काही ब्लॉगपुरती मर्यादित असलेली ब्लॉग परंपरा आता थेट सातासमुद्रापार गेली आहे. नवा बातमीदार हा नवा ब्लॉग मराठी पत्रकारितेत सुरु झाला असून हा ब्लॉग चालविणारी मंडळी थेॉ अमेरिकेत बसून ब्लॉग चालवित आहेत. (म्हणजे त्यांनी डिक्लेरेशन तरी तसं दिलंय बुवा)

याचाच अर्थ कोणी कोणावर टीका टिपण्णी केली आणि पत्रकाराच्या नाकाला मिरच्या झोंबल्या तरी त्याला हात चोळत बसण्यावाचून काहीही करता येणार नाही, असं दिसतंय. कारण पूर्वीप्रमाणेच हा ब्लॉगही बंद करावयाचा झाल्यास आता थेट अमेरिकेशी पंगा घ्यावा लागणार आहे. कारण आमच्या ब्लॉगमुळे तुमचे चारित्र्यहनन झाले असे वाटत असेल तर तुम्ही आम्हाला बिनदिक्कतपणे कायदेशीर नोटीस पाठवू शकता, असा नवा ब्लॉग नव्या बातमीदारवर पडला आहे. त्यात आयपी अॅड्रेस, संपूर्ण पत्ता आणि संपूर्ण नावही दिले आहे. त्यामुळे ज्यांना अशा ब्लॉगमुळे मनस्ताप होत असेल त्यांनी थेट अमेरिकी सायबर क्राईम डिपार्टमेंटशी संपर्क साधावा.

व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लिखाण स्वातंत्र्यावर स्वतः निर्बंध घालायचे. आणि पत्रकारितेवरील स्वातंत्र्याच्या हल्ल्याच्या नावाने गळे काढणाऱ्यांविरोधात असे ब्लॉग वाढत जात आहेत, ही चांगलीच गोष्ट म्हटली पाहिजे. अर्थात, कोणत्याही प्रसंगी वाहवत न जाता इतर ब्लॉगवर आलेली परिस्थिती आपल्यावर ओढवू नये, याची जबाबदारी या ब्लॉगवर आहेच. तेव्हा नव्या सुरुवातीस शुभेच्छा...

नव्या बातमीदारवरील नवा ब्लॉग खालीलप्रमाणे...

लीगल डिसक्लेमर

या ब्लॉग मधील मतांशी आपण सहमत नसाल, आपणास जर अब्रूहनन झाल्यासारखे वाटत असेल तर आपण आम्हाला कायदेशीर नोटीस पाठवू शकता. अशी नोटीस आपण खालील पत्त्यावर पाठवू शकता -

Manish Birla,
Software Analyst, Microsoft,
1065, La Avenida Mountain View,
CA, 94043, US


भारतातील सायबर कायद्यानुसार, भारतीय हद्दीबाहेरील कार्यक्षेत्रातून कार्यान्वित असलेली वेबसाइट अथवा सायबर हालचाल यावर सध्या तरी काही नियंत्रण आणता येत नाही. आंतरराष्ट्रीय सायबर कायद्यानुसार मात्र एखाद्या व्यक्तीला जीवाला धोका संभवत असेल तर सायबर हालचाल रोखण्यासाठी परस्पर सहकार्य वापरले जाते. मात्र आम्ही व्यक्तीस्वातंत्र्य आणि पत्रकारितेच्या उच्च मूल्यांचे पालन करण्यास बांधील आहोत. आपण जर आम्हाला एखाद्या अनुचित बाबीसंदर्शात अमेरिकी कायद्याच्या अधीन राहून भारतातील सक्षम अमेरिकी वकिलातीमार्फत कायदेशीर नोटीस पाठविली तर आम्ही तिचा जरूर स्वीकार करू. त्यामुळेच आम्ही आमची ओळख लपवून ठेवलेली नाही. मात्र आम्ही थर्ड पार्टी सायबर फेसिलीटेटर आहोत, हे कृपया जरूर ध्यानात घ्यावे.

सायबर कायद्यान्वये एखाद्याची अथवा एखादीची फेक (बनावट) प्रोफाईल तयार करून त्या व्यक्तीच्या नावे सायबारविश्वात वावरणे आणि फीशिंग अर्थात आर्थिक फसवणूक हे सर्वात गंभीर गुन्हे मानले जातात. काही प्राथमिक बाबतीत आपण स्वत:ही खबरदारी घेऊन टाळू शकता. काही प्राथमिक बाबी आपण माहितीही करून घेऊ शकता. जसे तुम्ही ज्या संगणकावरून इंटरनेटचा वापर करताय त्याचा युनिक पत्ता अर्थात आयपी एड्रेस; कसा ते इथे बघा! अगदी सोपे आहे, तुम्हालाही सहज जमेल.. 'ई-मेल'ला आलेल्या हेडरवरुन तुम्हाला सायबर विश्वातल्या कुठल्या पत्त्यावरून ते 'ई-पत्र' आलेय ते अगदी काही क्षणात कळेल. ज्या 'आय-पी'वरुन ई-मेल आलाय तो 'आय-पी' इथे टाका आणि सर्च करा. कुठल्या शहरातून, कोणत्या संगणकावरून, कुठल्या इंटरनेट सर्व्हीस प्रोव्हायडरच्या (आयएसपी) कनेक्शनवरुन ई-मेल पाठविला गेला आहे ते कळेल. एव्ह्ढेच काय कुठला ब्राऊझर आहे, कोणती ओपरेटिंग सिस्टीम पाठविणारा वापरतोय हेही कळेल.

आमचे लोकेशन :
My IP address is: 66.45.240.66
My IP Address Location: Secaucus in United States
ISP of my IP: Interserver

4 comments:

Anonymous said...

पत्रकार हे फक्त घरच्या म्हातारीचे काळ असल्याने ते या ब्लॉगचे आव्हान कसे स्वीकारतील?

महेंद्र said...

मी तो ब्लॉग वाचला. इतक्या सरळ सरळ उघडपणे आरोप करणारा तो ब्लॉगर जरी भारताबाहेरून लिहित असला, तरीही इतकी आतल्या गोटातली बातमी केवळ भारतामधूनच पुरवली जाऊ शकते. अमेरिकेत राहून इतकी इथ्यंभुत माहीती मिळवली जाऊ शकत नाही.
ब्लॉग आवडला. टाकतोय फेवरेट्स मधे.

Anonymous said...

best of luck Ashish! Pbd

Anonymous said...

आज झी २४ तासविषयी आल्याने हा नवा बातमीदार समजला ...GOOD ONE DEAR FROM AMERICA..AL D BEST