Sunday, December 26, 2010

टिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर

ब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा

पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आता ठाणे महानगरपालिकेनेही दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव बदलून संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघटनांपुढे मान तुकवावी, अशी आशा आहे. वास्तविकतः दादोजी कोंडदेव हे ब्राह्मण होते आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून ब्राह्मण इतिहासकारांनीच रंगविले, असा आक्शेप घेत संभाजी ब्रिगेड आणि त्यांच्या सहकारी संघटना थयथयाट करीत आहेत. पण हा विषय फक्त दादोजी कोंडदेव यांच्यापुरताच मर्यादित आहे का, तर नाही. हा विषय त्याही पुढे जाऊन ब्राह्मणविरोधाला जाऊन भिडतो.

ब्राह्मणवैरामुळेच समर्थ रामदासांना विरोध, वासुदेव बळवंत फडके पहिले क्रांतिकारक नव्हते तर उमाजी नाईक होते, लोकमान्य टिळकांनी नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंतीला सुरवात केली, अफझलखानाकडे कुलकर्णी आडनावाचा कोणी माणूस चाकरीस होता, या गोष्टी वारंवार पुढे आणून ब्राह्मण समाजावर आसूड ओढण्याचा प्रयत्न होतो आहे. पुस्तके लिहून नवा इतिहास बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सेतुमाधव पगडी, बाबासाहेब पुरंदरे आणि निनाद बेडेकर हे ब्राह्मण असल्यामुळेच त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे, हे आता ओपन सिक्रेट आहे. अर्थात, १९४८ पासून (गांधी हत्येनंतर) ब्राह्मण समाज अशा प्रकारची टीका, निंदा सहन करत आला आहे. त्यामुळे हे नवीन आहे, असे वाटण्याचे काहीच कारण नाही. सत्तेतही त्यांचेच राजे (जाणते असूनही अजाणतेपणाचा बुरखा घेऊन वावरणारे) असल्यामुळे संभाजी ब्रिगेडला आयती संधी आहे. असो.

पण या निमित्ताने मला गेल्या काही दिवसांपासून मांडायचं होतं ते मांडण्याची संधी मिळाली आहे. सर्वप्रथम ब्रिगेडने जी मोहिम उघडली आहे ती स्तुत्य, कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. पण ब्रिगेडने त्यांचे हे ब्राह्मणवैर इथेच थांबवू नये, अशी माझी मागणी आहे. त्यामध्ये ब्रिगेड आणि त्यांच्या सहकारी संघटना यशस्वी झाल्या तरच त्या कौतुकास पात्र आहेत.

पहिले म्हणजे ज्याप्रमाणे ब्रिगेडने दादोजी कोंडदेव यांचे नामोनिषाण इतिहासातून मिटविण्याचा प्रयत्न चालविला आहे, त्याचप्रमाणे त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि समर्थ रामदास यांचेही नाव पुसण्यासाठी लढा उभारावा. संतमहंतांची जात काढण्याचे काहीच कारण नाही. तसे करणे चूकही आहे. पण फक्त ब्राह्मणवैरच ज्यांच्या नसानसांत भरले आहे, त्यांच्यासाठी हे काही चुकीचे ठरु नये. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि रामदास यांचे नाव इतिहासातून, शालेय अभ्यासातून वगळावे, यासाठी पुढील आंदोनल असावे. कारण हे दोघेही ब्राह्मणच होते. तेव्हा आषाढी एकादशीला संत तुकोबारायांच्या पालखीबरोबर ज्ञानेश्वर महाजारांच्या पालखीऐवजी नामदेव, चोखामेळा किंवा तत्सम अब्राह्मण संतांची पालखी काढण्याची मागणी ब्रिगेडने करावी. श्री ज्ञानेश्वर तुकाराम ऐवजी श्री नामदेव तुकाराम असाही बदला त्यांना करता येईल.

छत्रपती शिवरायांचे कार्य आणि स्वराज्याचा भगवा ज्यांनी अटकेपार (पाकिस्तानमध्ये अटक नावाचे शहर आहे.) फडकाविला त्या राघोबादादांचे आणि समस्त पेशव्यांचे नामोनिषाण ब्रिगेडने मिटवून टाकावे. शनिवारवाडा पाडण्याचा कट काही बहुजन संस्थानी रचलेला आहेच. तशी आंदोलनेही होत असतात. त्यामुळे ब्राह्मण समाजालाच नव्हे तर समस्त हिंदुस्थानला अभिमानास्पद वाटणारा शनिवारवाडा जमीनदोस्त करुन तथाकथिक ब्राह्मणी वर्चस्वाला तडा देऊन टाकावा.

आणखी थोडे पुढे जाऊन झाशीच्या राणीच्या संघर्षाचा लढा इतिहासाच्या पुस्तकातून वगळण्यास सांगावे. झाशीच्या राणीचे माहेरचे आडनाव तांबे होते. तांबे म्हणजे ब्राह्मण. (कऱ्हाडे ब्राह्मण) महिला असूनही जिने पुरुषांना लाजवेल, असा संघर्ष केला त्या लढवय्या रणरागिणीचे नाव इतिहासात आहे कारण ब्राह्मण इतिहासकारांनीच तसे चित्र रंगविले आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई खरोखरच रणरागिणी होती की नाही, हे ब्रिगेडच्या इतिहासकारांनी शोधून काढले पाहिजे. झाशीच्या राणीचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकले पाहिजे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकातील तिचा पुतळा आणि झाशी या गावी जर पुतळा असेल तर तिथूनही पुतळे काढून टाकले पाहिजेत.

संभाजी ब्रिगेडने थोडे त्याच्याही पुढे जायला हवे. पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील लढवय्ये मंगल पांडे आणि तात्या टोपे, तेल्यातांबोळ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य टिळक, सुधारणावादी विचारांचे गोपाळ गणेश आगरकर, तत्वशील विचारवंत महादेव गोविंद रानडे, क्रांतिकारकांचे मेरुमणी स्वातंत्र्यवीर विनायम दामोदर सावरकर, चापेकर बंधू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या जोडीने फासावर जाणारे राजगुरु, इंग्रजांशी मुकाबला करताना धारातीर्थी पडलेले रामप्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद, अनंत कान्हेरे, महात्मा गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले, विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्शणात दैदीप्यमान कामगिरी करणारे महर्षि धोंडो केशव कर्वे, हिंदुस्थानचे राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर आणि वंदे मातरम् चे जनक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे इतिहासातील योगदान पुसून टाकले पाहिजे.

स्वातंत्र्योत्तर काळातील हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, केरळचे मार्क्सवादी नेते ईएमएस नंबुद्रीपाद, श्रीपाद अमृत डांगे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी प्रल्हाद केशव अत्रे आणि एस एम जोशी, भूदान चळवळ उभारणारे विनोबा भावे, सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे, इन्फोसिस या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती, पहिला हिंदुस्थानी अंतराळवीर राकेश शर्मा, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर, वेंकटराघवन, चंद्रशेखऱ, प्रसन्ना, व्हीव्हीएस लक्श्मण, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि डॉन ब्रॅडमनलाही ज्याने वेड लावले तो सर्वांचा लाडका हिरो सचिन तेंडुलकर, जागतिक विजेतेपदाला वारंवार गवसणी घालणारा हिंदुस्थानचा अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, हिंदुस्थानची गानकोकिळा लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, माधुरी दीक्शित... ही यादी हजारो लाखोंपर्यंत वाढत जाईल. या सर्वांचे नामोनिषाण इतिहासाच्या पानापानातून मिटविण्याचे मोठे आव्हान संभाजी ब्रिगेडपुढे असणार आहे. कारण ही मंडळीही दुर्दैवाने ब्राह्मणच आहेत.

ही मंडळी आज त्यांच्या त्यांच्या क्शेत्रात अव्वलस्थानी आहेत. ती ब्राह्मण असल्यामुळेच त्या स्थानी आहेत किंवा ब्राह्मण म्हणून जन्माला आल्यामुळे त्यांना ते स्थान सहजासहजी मिळाले आहे, असे जो म्हणेल त्याला बावळटच म्हटले पाहिजे. ही मंडळी कष्ट, परिश्रम आणि अथक मेहनत घेऊन त्या-त्या स्थानी पोहोचली आहेत किंवा प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत. फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी केकवॉक मिळालेला नाही किंवा कोणी मुद्दामून मदतही केलेली नाही. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वा परिश्रमांच्या जोरावर जर कोणी पुढे गेला असेल किंवा जात असेल, तर त्याची जात आडवी येत नाही. तसेच फक्त जातीच्या जोरावर कोणीही पुढे जाऊ शकत नाही, हे मान्य केलेच पाहिजे. किंवा तेच सत्य आहे. जे ही बाब मान्य करणार नाहीत, त्यांना भविष्य नाही हे मुद्दामून सांगण्याची गरज नाही.

सांगण्याचा मुद्दा असा की, काम केल्याशिवाय किंवा चमक दाखविल्याशिवाय फक्त ब्राह्मण आहे म्हणून कोणीही पुढे येत नाही, कोणालाही नाव मिळत नाही. जे शिकेल तो टिकेल, असे सध्याचे युग आहे. इतरांच्या दुर्दैवाने ब्राह्मण समाजाने शिक्शणाची कास सोडलेली नाही. त्यामुळे दादोजी कोंडदेवांपासून ते लतादीदींपर्यंत कोणत्याही ब्राह्मण व्यक्तीची कारकिर्द इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला तरी त्यामुळे कोणालाही फरक पडणार नाही. ब्राह्मण समाजाला तर मुळीच नाही. आणखी पुढे जाऊन म्हणायचे झाले तर, इतिहासातून जरी नावे पुसली गेली ती समाजमनावरुन नक्कीच पुसता येणार नाही. म्हणूनच म्हणतो की, हिंदुस्थानच्या इतिहासात खारीचा वाटा उचललेल्या प्रत्येक ब्राह्मण व्यक्तीचे नाव पुसून टाकले पाहिजे. दादोजींपासून सुरुवात झाली आहे ती सचिन तेंडुलकरपर्यंत येऊन थांबावी, हीच अपेक्शा आहे.

हार्दिक शुभेच्छा...

64 comments:

देविदास देशपांडे said...

संभाजी ब्रिगेडला माझे खूप खूप धन्यवाद आहेत. कारण संघटना नसती तर दादोजी पासून आतापर्यंतचे अनेक लोक ब्राह्मण होते हे मला कळालंच नसतं. राज्यघटना स्वीकारून ६० वर्षे झाली तरी केवळ मराठा असल्यामुळे काही लोकांना अन्याय सहन करावा लागतो, हेही मला कळाले नसते.

prashantpatil said...

History is written by winners. As every one is aware that Brahmans were winner at least until independence. History is written by brahmans. So at least try to accept there is difference and some people are not happy with their projection of history.
Nobody is denying work done by Gandhi, Tilak, Agarkar etc.

Waman Parulekar said...

Nice article but Lata Mangeshkars name you are included in the list of brahmins. As per my info she is Gomantak Maratha. By the way really nice article.

http://en.wikipedia.org/wiki/Gomantak_Maratha_Samaj

Anonymous said...

कालच्या सामना मधे अग्रलेखातून हेच विचार मांडले आहेत.
http://www.saamana.com/2010/December/25/agralekh.htm

या बातमीचा उल्लेखही कुठल्या दुसर्या पेपर ने केलेला नाही..! निषेध दूरच सकाळ लोकसत्ता मटा यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे याकडे..!
http://www.saamana.com/2010/December/25/Link/Main1.htm


पण प्रॉब्लेम हाही आहे की ब्राह्मण समाजाने समजून उमजून वागले पाहिजे.नथुराम ला स्मरणिकेत घुसडयची काही गरज होती का? अशाने आयाते कोलीत
नाही का मिळत?

Anonymous said...

सत्याच्या बाजूने उभा रहा राव आमचा विरोध बामणाला नसून बामणी काव्याला आहे..सत्य स्वीकारायला हव दादू कुलकर्ण्या,,,,रामदास खान हि पिलावळ इतिहासाम्धून काढायला हवीच..... जरा इतिहासच अभ्यास करा नंतर लिहा...जरा साळुंखे खेडेकर मा.म. देशमुख वाचा...(रामदास आणि पेशवाई वाचा) वरील पिलाव्लीचा इतिहास कळेल...
जय जिजाऊ जय शिवराय..


आर्यन राजे..

चिमणराव said...

मुळात मराठे महाराष्ट्रीयन नाहीत, ते राजपूत आहेत. अश्या बाहेरच्या लोकांनी महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचे कारण काय? ब्राम्हण आणि बहुजन हे इथले भूमिपुत्र; त्यांना आपसात लढवून राजपूत मराठा समाजाने गेली कित्येक वर्ष इथे राज्य केले आहे. आता त्यांची सत्ता जायची वेळ आली म्हणून निराशेतून त्यांनी असे प्रकार सुरु केले आहेत.

Anonymous said...

खेडेकर, साळुंखे महाराष्ट्राला मिळालेले शाप आहेत, ते काय लिहिणार? दळभद्री कुठले? इतकी वर्ष काय झोपले होते का? काही नाही हो, ब्राम्हण पुढे गेलेले झोंबतात यांना...पार्श्वभागात दम असेल तर बालासाहेबाना हात लावून दाखवा..तेही ब्राम्हणाच आहेत,

Anonymous said...

Ratrichya Veli Putale Padun (Halvun) Udyacha Ushhakkal Rokhata Yenar Nai.

Navya Varshasathi Aplya Blog la Puraskar Milalach Pahije. Shubhecha.

Jay Maharashtra

Mangesh K.

Anonymous said...

I find its a good article.Since past 10 years this anti bramhin movement is taking foothold in Maharastra.Its a game to disturb society at large and create havoc later on.This thought is percolating to students,making them bias towards one community.According to me its entirely political game but making serious impact on our society.How to solve this problem, I know today these brigade do not have enough supporters but it making impact on subconscious mind of Maratha Students,making them bias.Think on it and come up with a solution.

Anonymous said...

Hi Ashish,

As usual very good article.
Ashya rajkarni lokanna jodya ne maraichi pan laiki nahiye.
Ofcourse, as u said putale kadha, kinva nava kadha, samaj mana var kahich pharak padnar nahi.

Regards
Mandar

Rahul Jagdale said...

challenging d claim of "dadoji kondev" and related things ... doesn't mean that someone is trying to underplay or insult whole brahmin community ..is it ? dont make it a sensitive issue ..n create a propaganda

Kalandar said...

@Rahul,
unfortunately it is not related to Dadoji only. But it has gone further ahead and become all anti-brahmin. Dadoji, Ramdas, they are looking for every brahmin.

Unknown said...

Abhaspurn article vachun anand zala. Deshache pahile pantpradhan Kashmiri brahmanach hote. Tyamule gaogavi maharadhtrat tyanche putale aahet tehi kadhun taknyache divya kam Sambhaji Brigadene hati ghyave v tyatya jagi jivantpani sambhaji brigade v tyana pathimba denarya a-rashtravadi lokanche (Punyapurte bolayache tar Mohansing Rajpal,Anil Bhosale, Nikam, Rajlakshmi Bhosale etc.) putale ughadyawar ubhe karavet mhanaje kavlyana basayala jaga tari hoil

Anonymous said...

Sundar blog..........aapale abhinandan.

Rajendra Banait

Anonymous said...

सध्याचा काळ असा आहे की, एखादी गोष्ट टिकवू म्हणाल तर ती टिकावू असल्याशिवाय टिकणार नाही आणि मिटवू म्हणाल आणि गुणवत्ता असेल तर मिटवता येणार नाही. त्यामुळे मराठी भाषा टिकणार का, हिंदू समाजाचे काय होणार, या देशाचे काय होणार, ब्राह्मणांचे काय हो...णार हे चिंतचे विषय नाहीत. यातील टिकाऊ, प्रवाही आणि समाजासाठी उपयुक्त बाबी टिकतील नव्या निर्माण होतील. माणसाच्या शेपटीप्रमाणे समाजासाठी उपयुक्त नसलेल्या गोष्टी आपोआप गळून पडतील. त्यामुळे कुणीतरी आपले नामोनिशाण मिटवायला निघाले आहे , अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. अ खेर बंदा रुपया खणखणीत वाजणारच.
तू जे मुद्दे उपस्थित केले आहेस, की, त्यावरुन असे दिसते की, हिंदू समाजाचे संघटन करण्याच्या कामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्रात गेल्या पन्नास वर्षात जे काम केले त्यात काही तरी उणीव राहिली असावी किंवा काही स्वयंसेवकांचा या त्यातील प्रामाणिकपणा कमी पडला असावा. अन्यथा समाजात आज चाललेली घुसळण आणि जातीच्या अस्मिता टोकदार होऊन स्वयंसेवकही त्यात हिरिरीने उतरतील याचा अंदाज संघ नेतृत्त्वाला आला असता . पण तसे घडले नाही. जातींवरुन तेढ वाढवण्याचे प्रयत्न सध्या सुरु असताना संघाने यासंदर्‍भातील आपली भूमिका स्पष्ट करुन निखळ हिंदू संघटनेचा आपला कार्यक्रम लोकांसमोर ठोसपणे मांडायला हवा होता. ग ेल्या पन्नास वर्षात हिंदू संघटनेचे नेतृत्व अन्य जातींकडे जाणीवपूर्वक देणे गरजेचे असताना संघाला हे जमले नाही.
२००७ पासून परभणी, बीड, पुणे येथे झालेल्या ब्राह्मण समाजाच्या अधिवेशनांना मी पूर्णवेळ उपस्थित होते. तिथे मी अनेक निरीक्षणे नोंदली आहेत. त्यापैकी इथे सांगण्यासारखे म्हणजे या अधिवेशनांना झालेली ब्राह्मण समाजातील स्वयंसेवकांची आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते म्हणवणार्‍यांची गर्दी.
पुण्यात तर संघ परिवारातील शिक्षणसंस्था आणि बँका चालवणारे धुरीणही उपस्थित होते. याचा अर्थ असा आहे की, ब्राह्मणांचे संघामध्ये प्राबल्य असल्याने त्यांना ही संघटना आपली वाटत होती. परंतु प्रत्यक्षात संघ हिंदू संघटनेसाठीच कार्यरत होता आणि आहे. त्यामुळे आता बद लत्या परिस्थितीत आधार शोधण्यासाठी हे स्वयंसेवक जातीच्या अधिवेशनांचा आधार शोधू लागले आहेत. तुझ्या लेखावरुन असे वाटते की आता तुलाही हाच मार्ग पकडावा असे वाटू लागले आहे की काय? तू जी नावांची यादी दिली आहेस त्यातील प्रत्येक व्यक्ती कर्तृत्वाने मोठी होती, आहे म्हणून त्यांच्याकडून असामान्य कार्य झाले आहे, ते विशिष्ट जातीचे होते म्हणून नव्हे. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत स्वतःला सुरक्षित वाटण्यासाठी त्यांचा आधार घ्यावा लागणे हीच निराशा दाटवणारी बाब आहे. असो. तुझ्या मांडणीला एक प्रथम वर्ष शिक्षित स्वयंसेवक म्हणून शुभेच्छा.

Suhas Yadav

Anonymous said...

उत्तम झालाय लेख.पण ही लोक ब्राह्मणाच्या नावाने कितीही शंख करोत,असले कितीही पुतळे हलवू देत पण फरक पडता कामा नये.कारण त्यांच्या लग्न,वास्तुशांत ,पूजा,ग्रहशांती,आणि अंत्य संस्कार यासाठी यांना ब्राह्मणच लागतो ना ?मुहूर्त काढणे वगैरे पद्धत ब्रा...ह्मणातच आहे ना ?मग त्यांनी हे आधी सोडायला हव.
नुसते पुतळे हलवून किवा त्याला विरोध करून ब्राह्मण समाज मिटणार नाही !!
या लोकांत खरच हिम्मत असेल तर ब्राह्मण बाजूला ठेवून तूंची सगळी कार्य करून दाखवा.एवढच काय तर तुमच्या घरातला कार्निर्णय आणि पंचांग पण काढून टाका आणि मग बोला!!

Swapna Sapre

Anonymous said...

स्वप्नाजी, असे शब्द वापरुन आपण मोठ्या समुदायाला हिंदू धर्मापासून लोटत आहात, असे वाटत नाही का. कृपया एकमेकांपासून दूर जाण्यापेक्षा जवळ कसे येता येईल, याचा समजदार व्यक्तीनी तरी विचार करावा असे वाटते. कदाचित ही फक्त माझी जबाबादारी नाही, असे तुम्ही रागावून म्हणाल. पण हा समाज आणि देश एक ठेवण्याची जबाबदारी असलेले अनेक लोक आहेत. त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करा ही विनंती.

Suhas Yadav

Anonymous said...

Suhasji, Couldnt agree with you more on both comments. One cannot ever say that I am indispensable. And when one tries to emphasize that point, results are obvious hatred. Even though whatever that is happening is politically motivated, we cannot deny the fact that brahmins for a long time now bear same attitude as displayed by Swapnaji..!

Omkar Parkhi

Anonymous said...

सुहास जी,एकतर लोक अवधे माठ असतील असा मला वाटत नाही.आणि कोणता समुदाय हिंदू धर्मापासून लांब जाणार आहे?आणि मी जे म्हटलं ती एक अशक्य प्राय गोष्ट आहे हे तुम्हीही सांगू शकता.असे पुतळे हलवून राजकारण करून हे लोक काय साधतात?आणि सरकार कोणाच्या बाजूने... आएह सांगा?निरपेक्ष सरकार असायलाच हव.तरच प्रगती होऊ शकते.टिळकांनी ,सावरकरांनी जे काही केलाय त्याची सर येऊ शकते का कोणाला ?सगळे क्रांतिवीर महान आहेत,टिळक काय,आगरकर काय,आणि फुले काय ?पण त्यांनी केलेलं समाजकार्य हे सगळ्या लोकांसाठी होत.त्याच तुम्ही जाती पतित विभाजन करून काय साहता?हेच मला झेपत नाही!!
एकमेकांना जवळ आणायचे असेल तर प्रथम ब्राह्मण हेटाळणी बंद झाली पाहिजे.जेव्हा ब्राह्मण लोकांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करता तेव्हा समोरच्याने पण तसेच वागले पाहिजे!!आणि ते जर जमणार नसेल तर आमच्याकडून पण चांगल वागायची अपेक्षा ठेवूच नका!!अस माझ तर श्सरळ मत आहे!!
माझ्या आता पर्यंत च्या आयुष्यात खुला वर्ग म्हणून शिक्षण,नोकरीच्या ठिकाणी बढती न मिलालायची उदाहरेन बघितली आहेत.ज्यांची लायकी नसताना फक्त एका दाखल्यावर प्रवेश मिळतो आणि गुणवत्ता असलेला पण ब्राह्मण म्हणून मागे राहतो.पण अस जरी असल तरी ज्याच्याकडे गुणवत्ता तोच पुढे जातो हे नेहेमी सिद्ध झाल आहे!!आणि होत राहणार!!त्याला कोणीही उसने पुरावे देण्याची गरज नाही!!
असा जरी असाल तरी ब्राह्मण म्हणून जन्माला का आलो?असा प्रश्न मुळीच पडत नाही आणि पडणार नाही !!
त्याचा आम्हला अतिशय अभिमान आहे.त्यात पुणेरी अभिमान जरा जास्तच आहे.या असल्या पुतळे हलवा,हे काढा ते काढा प्रयत्नांनी जर त्यांना वाटत असेल कि ब्राह्मण समाज संपेल तर करूदेत त्यांना तय्न्चेह प्रयत्न!!
आम्हीही बगाहतो ते कसे सफल होतात ते!!

Swapna Sapre

Anonymous said...

Swapnaji, there is noticeable difference in the intensity and direction amongst two comments of yours. Do you see it?

Omkar Parkhi

Anonymous said...

omkarji,it's ans to suhasji,s question!

Swapna Sapre

Anonymous said...

Ashish tuza lekh farachh sundar ahe, maza barech divas ya vishayawar blog lihanyachi iccha hoti pan tu lihun jawalpas mazhyach bhavana vyakta kelyas. Phakta mala evdech add kariche ahe ki brahmnanani samaj, rashtra, kala, vidya aslya bhan...gadipasun swatthala dur thevave ani keval marwadi ani gujrati samajapramane arthik utkarshachi kas dharavi. brhamnanvar bhunkari hi kutri, gujarati marwadyansamor matra gonda gholtat karan tyanchi dhanskati, tilak, agarkar,savarkar, tendulkar, gokhale, mangeshkar asle junat adarsh takun deun virendra mhaskar, narendra murkumbi, d s kulkarni yancha adarsh samor thevava. ta.ka. mazya marwadi gujrati mitrano tumchha ullekh ha kautukanech kela ahe, tumcha apman karnyacha kontahi uddesh nah.

Makarand Gadgil

Anonymous said...

Swapanji, Indeed true, but is the second comment what we should look forward to. The point is your first instinct was kind of "eye for eye" which will not be appreciated by any community. Either community should show maturity at the moment is what I feel.

Omkar Parkhi

Anonymous said...

Sir, Aaj cha Blog Sundar ahe.

Bhimashankar Waghmare

Anonymous said...

Good morning Ashish,

SUPERB.

AS U HAVE MENTIONED SO MANY THINGS IN THE ARTICLE, I WAS NOT AT ALL AWARE OF IT.SO THANKS A LOT.

NORMALLY I SAY TO EVERY ONE THOSE WHO JUST HATE BRAHMIN COMMUNITY THAT :-

I THINK THAT IN INDIA BRAHMIN POPULATION MUST BE AROUND 0.00001 % , HOWEVER GOVT IS NOT CONSIDERING US AS MINOR COMMUNITY AND THIS IS THE STRENGTH OF BRAHMIN COMMUNITY.

H. P. Deodhar

Anonymous said...

छान अतुल खरंच फार महत्वाच आहे हे
पण हे सगळं करताना एक गोष्ट जिच भान ठेवायला हवं ते म्हणजे दोन्ही डॉक्टरांनी : Dr Hedgewar & Dr. Mohanrao Bhagwat, सांगितल्याप्रमाणे आपण आपली शक्ती वाढवायची ती इतकी कि कोणी वाकडा डोळा करून पाहू शकणार नाही
परंतु आपण कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही
सर्व धर्म हे माणसाला माणूस बनवण्यासाठीच आहेत
त्यातले काही लोक चुकीचे असू शकतात सगळे नव्हेत
आपण फक्त आक्रमकांच्या विरुद्ध आहोत.
सामान्य मुसलमान किंवा christian सामान्यच असतो.

Dr. Prasad Phatak

Anonymous said...

छान अतुल खरंच फार महत्वाच आहे हे
पण हे सगळं करताना एक गोष्ट जिच भान ठेवायला हवं ते म्हणजे दोन्ही डॉक्टरांनी : Dr Hedgewar & Dr. Mohanrao Bhagwat, सांगितल्याप्रमाणे आपण आपली शक्ती वाढवायची ती इतकी कि कोणी वाकडा डोळा करून पाहू शकणार नाही
परंतु आपण कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही
सर्व धर्म हे माणसाला माणूस बनवण्यासाठीच आहेत
त्यातले काही लोक चुकीचे असू शकतात सगळे नव्हेत
आपण फक्त आक्रमकांच्या विरुद्ध आहोत.
सामान्य मुसलमान किंवा christian सामान्यच असतो.

Dr. Prasad Phatak

Anonymous said...

अरे बाबानो, हा केवळ राजकारण्यांचा डाव आहे. सीबीआयच्या छाप्यानंतर सर्वत्र बोबांबोब होऊ लागली, त्यापासून वाचण्यासाठी हे जाणीवपूर्वक केलेले कव्हरींग फायर आहे. त्याच बरोबर लवासाला न्यायालयाच्या नजरेतून वाचविण्यासाठी आणि प्रतिमा उजळून काढण्यासाठी ही या कव्हरींग फायरचा वापर होणार आहे. हा पुतळा हलवा हलवीमुळे आपण सामन्य चाकरमानी माणसे एकमेकांकडे शंकेने पाहण्यास सुर करतो, तिथेच हे राजकारणी जिंकतात. राष्ट्रीय राजकारणांसाठी या पुण्यातील घटनेचा उपयोग कसा होईल, त्यावर तुम्ही येत्या तीन महिन्यात नजर ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही घटना कालच घडली असल्याने त्याच्या हेलकाव्यासोबत आपण सामान्य पक्षी गोंधळून जाणार यात काही वाद नाही. पण वरील प्रतिक्रीया पाहता, आपल्या समाजातील लोकांच्या मनांमध्ये जातीपातीच्या रेषा आखण्यास सुरूवात झाली आहे. म्हणजे शंभर-दोनशे वर्षांपूर्वी ज्या समाजसेवकांनी जाणीवपूर्वक जात संपविण्यासाठी आपले आयुष्य गाडून घेतले, त्यांचे बलिदान कालौघात व्यर्थ जाते की काय असे वाटते.
(कृपया यावर जरूर विचार करा.)

..आणि आशिषराव तुम्ही हा लेख लिहिला खरे. पण तो लिहिताना तुमच्यातला पुरोगामी पत्रकार बेशुद्ध होता, असे वाटते. तुमच्यातला पत्रकार जागी असता तर अशा घडण्यांच्यावेळी किती संयमाने वागावे लागते हे कळले असते. असो... हा अनुभव कमी असल्याचे द्योतक आहे. तुम्हीही काही वर्षांनंतर अनुभव समृद्ध होऊन समजदार व्हाल, यात मला तरी शंका नाही.

Anonymous said...

Namsakar Ashish

Mi aaj tuza blog ek mail ali hoti mhanun vachayala ghetal. Tula vishwas basnar nahi pan mi javal javal tuza sagala blog , older blogs sarva vachun kadhale. Mi 2 tas vachat ahe. Kharach tula ishwari denagi ahe. Vishesh karun tuze khadadiche lekh farach mast ahet.

Asech lihit ja.

Ganesh Joshi

Anonymous said...

aryan raje & other Anti Bramhin...
Plz read Original Bhagwat And then Comment

vaibhav said...

अमेरिकेने पोसलेला इस्लामी दहशतवाद जसा त्यांच्या मुळावर उठला आहे, त्याप्रमाणे, 'संभाजी ब्रिगेड'सारख्या संघटनाही त्यांच्या पोशिंद्यावर प्रतिवार करतील, जर आपले राज्यकर्ते त्यांना थांबविण्याऐवजी प्रोत्साहन देतील.

दोन शतकांपूर्वी इंग्रज "फोडा आणि राज्य करा" हे धोरण राबवून २०० वर्षे आपल्याला गुलाम बनवून आपल्यावर राज्य करून गेले, आपल्याला दरिद्री बनवून गेले. आताचे राज्यकर्ते हेच करताहेत, फक्त ते 'संभाजी ब्रिगेड' सारख्या संघटनांच्या खांद्यावर ठेवून "फोडा आणि राज्य करा" ची बंदूक चालवताहेत.

हा काळ खरोखरीच संकटांचा आहे, कारण देशाचे सत्ताधारीच देशाचे दुश्मन जाहले आहेत. सत्तेपुढे देशहिताला बगल देणारे सत्ताधारी हे बाहेरून आलेल्या दहशतवाद्यांपेक्षा कित्येक पटींनी देशासाठी अधिक घातक आहेत.

सध्याचे देशाचे सत्ताधारी हे त्या बापासारखे आहेत ज्याच्यापासून त्यांच्या पोरीबाळींनी पण जपून रहावे. सत्तेच्या वासनेने ते कधी देशाचा बलात्कार करतील (किंबहुना करताहेत) ते सांगता येत नाही.

Anonymous said...

phaarach chaan lihile ahe. ithe karmachi kaas dharayche yug ale taree kahi jamatinna jatee palikade kahee disat nahi. ani he mhane hindustanas pudhe nenar.itihaas ghadavtana shree shivaji maharajanni jee door drushti dakhavlee, te ya karma daridri pudharyankade nahi..

Anonymous said...

Zakaas vishay kaadhalaas ... But what will happen with this kind of polorisatin ... they can gain only in Pune ... I think you should move ahead with the subject and also say that how many Maratha's have benefitted from the Politicas of castism? How Manay maratha's have come out of poverty shadow? they are going to ruin the social ethos of the state.
- Shailesh

Anonymous said...

गर्व से कहो... ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे.. धर्मसंसदेपेक्षा संसद मोठी नाही.
काशी मथुरा झाकि है.. आम्हाला धर्मांध म्हणणार असाल तर होय आम्ही धर्मांध आहोत. गुजरातची दंगल ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती.

आरक्षणाला आम्ही जगाच्या अंतापर्यंत विरोध करणार.. मला आरक्षणवालाच नवरा हवा
न्यायालयावर आमचा विश्वास नाही. मंदीर तो होके ही रहेगा..
इस देश मे रहना है तो ...
घटनेबद्दल आम्हाला प्रेम नाही. मनुस्मृती ही देशाची सनातन कायदेसंस्था आहे.

आठवतंय का हो काही ? दहा वर्षापूर्वीचा उन्माद आहे हा. कुणाचा बरं ?

Anonymous said...

@ above
he he he.. !

Nice Post

Anonymous said...

स्त्री शिक्षणाचा पाया कुणी घातला ?
हा प्रश्न विचारला तर बहुतेक मुलं महर्षि कर्वे यांचं नाव सांगतात. महात्मा फुले यांनी दगडधोंडे खाऊन पुण्यात पहिली शाळा काढून महिलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला हे लोक का विसरत चाललेत ? कारण अनुल्लेख. आता असं कुणी म्हटलं कि चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने महात्मा फुलेंना अनुल्लेखाने मारणारे कृतघ्न म्हणतात.. वाटलंच कारण महर्षि कर्वे ब्राह्मण ना ?

आता आमचं महर्षि कर्वेंशी काय भांडण बाबांनो ? पण तुमची पापं समोर आली कि तुम्ही आकांडतांडव करणार यात नवल ते काय ?

इतिहासात जायचं कि नाही ते एकदाच काय ते नीट सांगा. बघा ना त्या बाबरी मशीद - रामजन्मभूमी वादाने किती वर्षे देशाचे वातावरण बिघडलेले होते. जे मेले त्यांची जात पण बघा ना. एकही ब्राह्मण नाही हो त्यात. भडकवणा-या लेखण्या कुणाच्या होत्या त्यांची जात पहा मात्र नक्की..

आगरकर, टिळक ही नावं आम्हाला ही वंदनीय आहेत. पण रयतचं काम खेड्यापाड्यात घेऊन जाणा-या शिक्षणमहर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना ़आ विसरता बाबांनु ?
शिंदे, फुले ब्राह्मण नव्हते म्हणून का ?

सूर्याजी पिसाळच्या गद्दारीवर लिहीताना अफझलखानाच्या वकिलाचं नाव कुलकर्णी होता हे का दडवता बाबांनु ? प्रिम्टींग मिष्टेक म्हणायची का ?
तरी तुम्ही इनोसन्ट का ?
रामदास स्वामींबरोबर आमचं काय भांडण आहे का ? पण ते महाराष्ट्रात आले तेव्हा महाराज ४२ वर्षांचे होते. त्यानंतर ते फक्त आठच वर्षं जगले. मग स्वराज्याची प्रेरणा स्वामीजींनी महाराजांना बॅकडेटेड कशी काय दिली हे पण पाहणं मनोरंजक ठरेल ना ?
दादोजी कोंडदेव गुरू होते कि नव्हते हा वाद सोडवण्यासाठी शासनाने नेमलेल्या कमिटीत ब्राह्मण ईतिहासकारांनी काय पुरावे दिले ते समजलं तर या ब्रिगेडींना आम्ही जाब विचारू हो.. पण तुम्ही त्या कमिटीत असताना समकालीन पुरावे पाहून तुम्ही निरूत्तर झालात हे खरं ना ?
बोला पंत बोला..
हिंदुंवर अन्यायकारक मुघलांनी जिझिया कर बसवला असा ईतिहास आम्हाला शाळेत शिकवला जातो. पण या जिझिया करातून ब्राह्मणांना सूट होती हा भाग वगळला जातो. असं का बरं पंत ?
शिवाजीचं राज्य ते केव्हढंसं? चार जिल्हे पण नाहीत असं खाजगीत म्हणना-यांना पेशवाईचा किती अभिमान असतो हे का दडून राहीलय ? ते इतके शहाणे होते तर शिवाजी महाराजांना प्रेरणा ब्रिरणा देत बसण्यापेक्षा स्वतःच का नाही स्वराज्य स्थापन केलं असे प्रश्न आम्हाला पडतात. अटकेपार झेंडे नेले.. कबूल. पण मुघलांचा शेवटचा शक्तिशाली बादशहा औरंगजेब महाराष्ट्रात मुक्काम ठोकून बसला होता तो काय चार जिल्ह्याच्या राज्याचा धसका घेऊन. इथंच त्याने देह ठेवला आणि मग मुघल साम्राज्य लयास गेलं. बाकि सि़हाच्या जबड्यात हात घालण्याची सुरूवात केली म्हणूत तर स्वराज्य उभं राहीलं हे ज्यांना मान्य नाही ते काय काहीही बरळतील.
पण याच शिवाजी महाराजांचं नाव तुम्हाला राजकारणासाठी का वापरावं लागतं ? वापरा ना पेशव्यांच नाव. कोणी विरोध नाही करणार तुम्हाला..

Anonymous said...

Dear Shri Aashishji,

I appreciate your blog. in the JANATA RAJA maha-natya program held in Nanded in 1998, the local muslims agitated to delete the AFZALKHAN -VADHA part of the natya. And unfortunately the part was deleted.

No MARATHA MAHASANGHA cared about for that. because they afraid of muslim goondas. bramhins are soft target to show muscles. even after nanded show in many places that part was continued deleted .

Yours,

Nagnath kale

Anonymous said...

स्त्री शिक्षणाचा पाया कुणी घातला ?
हा प्रश्न विचारला तर बहुतेक मुलं महर्षि कर्वे यांचं नाव सांगतात. महात्मा फुले यांनी दगडधोंडे खाऊन पुण्यात पहिली शाळा काढून महिलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला हे लोक का विसरत चाललेत ? कारण अनुल्लेख. आता असं कुणी म्हटलं कि चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने महात्मा फुलेंना अनुल्लेखाने मारणारे कृतघ्न म्हणतात.. वाटलंच कारण महर्षि कर्वे ब्राह्मण ना ?

आता आमचं महर्षि कर्वेंशी काय भांडण बाबांनो ? पण तुमची पापं समोर आली कि तुम्ही आकांडतांडव करणार यात नवल ते काय ?

इतिहासात जायचं कि नाही ते एकदाच काय ते नीट सांगा. बघा ना त्या बाबरी मशीद - रामजन्मभूमी वादाने किती वर्षे देशाचे वातावरण बिघडलेले होते. जे मेले त्यांची जात पण बघा ना. एकही ब्राह्मण नाही हो त्यात. भडकवणा-या लेखण्या कुणाच्या होत्या त्यांची जात पहा मात्र नक्की..

आगरकर, टिळक ही नावं आम्हाला ही वंदनीय आहेत. पण रयतचं काम खेड्यापाड्यात घेऊन जाणा-या शिक्षणमहर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना ़आ विसरता बाबांनु ?
शिंदे, फुले ब्राह्मण नव्हते म्हणून का ?

सूर्याजी पिसाळच्या गद्दारीवर लिहीताना अफझलखानाच्या वकिलाचं नाव कुलकर्णी होता हे का दडवता बाबांनु ? प्रिम्टींग मिष्टेक म्हणायची का ?
तरी तुम्ही इनोसन्ट का ?
रामदास स्वामींबरोबर आमचं काय भांडण आहे का ? पण ते महाराष्ट्रात आले तेव्हा महाराज ४२ वर्षांचे होते. त्यानंतर ते फक्त आठच वर्षं जगले. मग स्वराज्याची प्रेरणा स्वामीजींनी महाराजांना बॅकडेटेड कशी काय दिली हे पण पाहणं मनोरंजक ठरेल ना ?
दादोजी कोंडदेव गुरू होते कि नव्हते हा वाद सोडवण्यासाठी शासनाने नेमलेल्या कमिटीत ब्राह्मण ईतिहासकारांनी काय पुरावे दिले ते समजलं तर या ब्रिगेडींना आम्ही जाब विचारू हो.. पण तुम्ही त्या कमिटीत असताना समकालीन पुरावे पाहून तुम्ही निरूत्तर झालात हे खरं ना ?
बोला पंत बोला..
हिंदुंवर अन्यायकारक मुघलांनी जिझिया कर बसवला असा ईतिहास आम्हाला शाळेत शिकवला जातो. पण या जिझिया करातून ब्राह्मणांना सूट होती हा भाग वगळला जातो. असं का बरं पंत ?
शिवाजीचं राज्य ते केव्हढंसं? चार जिल्हे पण नाहीत असं खाजगीत म्हणना-यांना पेशवाईचा किती अभिमान असतो हे का दडून राहीलय ? ते इतके शहाणे होते तर शिवाजी महाराजांना प्रेरणा ब्रिरणा देत बसण्यापेक्षा स्वतःच का नाही स्वराज्य स्थापन केलं असे प्रश्न आम्हाला पडतात. अटकेपार झेंडे नेले.. कबूल. पण मुघलांचा शेवटचा शक्तिशाली बादशहा औरंगजेब महाराष्ट्रात मुक्काम ठोकून बसला होता तो काय चार जिल्ह्याच्या राज्याचा धसका घेऊन. इथंच त्याने देह ठेवला आणि मग मुघल साम्राज्य लयास गेलं. बाकि सि़हाच्या जबड्यात हात घालण्याची सुरूवात केली म्हणूत तर स्वराज्य उभं राहीलं हे ज्यांना मान्य नाही ते काय काहीही बरळतील.
पण याच शिवाजी महाराजांचं नाव तुम्हाला राजकारणासाठी का वापरावं लागतं ? वापरा ना पेशव्यांच नाव. कोणी विरोध नाही करणार तुम्हाला..

एकदम सुंदर आणि अभ्यासपूर्ण टीपणी

(वेरी गुड मावळ्या)... पण वरील लेख हा संयमी पत्रकाराचा नाही.

आता या फोन टॅपनंतर हे बा. चांदोरकर बा. नावेर्कर आणि बा. डॉक्टर गोऱहे बद्दल काय लिहिनार. आशिष पंत तुम्ही चुकलात हे मान्य करा. आणि खरं तर पत्रकारातेची ओळख तुम्ही तुमच्या जातीचा उदो उदो करण्यासाठी वापरलात त्याबद्दल तुम्ही आम्हा सर्वांची माफी मागितली पाहिजे. तेही याच ब्लॉगवर...

rupalipethkar@gmail.com said...

Ashish... tu je mandles te agdi amcha manatle ahe.. faqt tu tyala yogya shabdat baddha kele aahes..
Zakas.......
ha lekh tya saglya sambhaji brigadela vachayla dila pahije...

Anonymous said...

कशाला पाहिजे ब्राह्मण, मराठा, हिंदू मुस्लीम? फक्त भारतीय म्हणून जगायचा प्रयत्न झाले तरी सगळे मिळवले...
२१वे शतक आपल्याला १४व्या शतकात नेयील ही कल्पना नाह्वती... History repeats itself. Indians remained divided अंड fighting since centuries and millennium, and they will continue to remain divided (further dividing into vidharbha, marathwada, mumbai, telangana, andhra, gujarat, kutch, saurashtra, seperate land for nagas, and many more like brahmin lands, Scheduled caste land, OBC land, BC land but never united India) in coming million years too... Do not worry, the world is not enough... neither it will end in 2012. Sad thing is we have forgotten humanity.स्वतःच्या धुंगनाला आग लागली तर कुत्री सुद्धा बोंबा मारतात... मनुष्य असूनही कुत्र्या सारखे वागणे भारतीयांनी बंध करावे नवं वर्षात... नाही तर अमेरिका, युरोप , चीन, दक्षिण कोरिया किव्वा जर्मनी पेक्षाही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागेल यात काही २ मत नाही...

deepak said...

आशीष सर आपले ब्लॉग अगदी थकक करायला लावणारे आहेत माला ब्लॉग संद्रभात माहित झाल ते केवल तुमच्या ब्लॉग मुलेच. त्यामुले मी तुमचा खुप आभारी आहे. मी माझ्या अनेक मित्रना या ब्लॉग संधार्बह्त सांगतोय अन त्यांचे ब्लॉग तैयार करूनही देतोय. मी स्वतः सुधा ब्लॉग सुरु केला आहे. मात्र मराठी टायपिंग च्या या वेगळ्या की बोर्ड ची सवय नासल्यामुले मी एटक मोठा लिहू शकत नहिय. त्यामुले आपण प्रेस मधे वापरतो तसे की की बोर्ड ब्लॉग लिहिन्यासाठी उपलब्द होऊ शकतील का? तुम्ही एअताजे मोठे ब्लॉग लिहिता त्यासती कोणता की बोर्ड वापरता? त्याबदल थोड गाइडंस काराव ही विनंती म्हणजे तुमच्या ब्लॉग ला मी ही भरभरून प्रतिक्रिया देऊ शकेन.

दीपक होमकर,

सोलापुर

Anonymous said...

atyant sadkya mendutun Marathyan viruddh garal taknara sumar lekh aahe. swastatlya prasiddhisathi ase bhampak likhan karnyacha sambandhitacha chand aslyache samjale. sakal v pawaranwarhi yapurvi thithech nokri karun hinkas tika kelyachehi samajale. ravindranath tagore, vengsarkar, laxman, hi mandali brahman nahit yache sadhe dgyan hi lekhakala nahi, dusrya dainikatil majkur chorun prasiddhi milavane sodave. marathyanchhi buddhi punha bhramit karu naye.

Anonymous said...

In last few years, more brahmin candidates are trying to get into politics than some decades before. The present situation is an effort to instigate voters so that these candidates will have a big disadvantage to overcome at the start of their career.

mithun said...

u r very sensitive about sambhaji brigade.really its very big matter...
Tangdya toda tyanchya,Dhungnavar laath mara.

Anonymous said...

यांच्यापेक्षा मनसे शिवसेना कितीतरीपटीने बरी म्हणायची किमान ते मराठी या तीन अक्षरी शब्दाखाली सगळ्यांचाच विचार करतात . पण ब्रिगेडवाले तर महाराष्ट्रच तोडायला निघाली आहे. खरच, जर असं झालं तर महाराष्ट्र या नावातील महान हा शब्दच खाली गळून पडेल .

Pratik Kasture

raju said...

khup sunder bog

raju said...

khup khup sunder bog

kharach brahmananch karya kawtukaspadach hota

raj said...

ek sarake badbadun mote hone aani rajachi gulamgiri karun pustake liun mahan zalelaya brahmanchi nave aaplayala mahit nahit ka?
pratek mandirat dev aani bhakatat aantar teun dalali gola karanare brahman aahet
sopanaji,aamalaha sharad,barase gatalaynatarach moksh miltao he sanganare brahmanch aahet

Anonymous said...

चिमणराव तुझे नाव चुत्याराव ठेवायला पाहिजे..मराठे बाहेरचे आणि तुझी पिलावळ मराठी काय? आबे आम्ही मराठे फक्त याच राज्यात राहिलो आणि राहणार..पण तुम्ही लोक जसे जगभर मुसलमान तसे तुम्ही पूर्ण भारतात राहतात..आम्ही नसतो तर तुझ्या डोक्यावरची शेंडी तुझ्या हनुवटीवर आली असती..

Anonymous said...

स्त्री शिक्षणाचा पाया कुणी घातला ?
हा प्रश्न विचारला तर बहुतेक मुलं महर्षि कर्वे यांचं नाव सांगतात. महात्मा फुले यांनी दगडधोंडे खाऊन पुण्यात पहिली शाळा काढून महिलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला हे लोक का विसरत चाललेत ? कारण अनुल्लेख. आता असं कुणी म्हटलं कि चोराच्या उलट्या बोंबा या न्यायाने महात्मा फुलेंना अनुल्लेखाने मारणारे कृतघ्न म्हणतात.. वाटलंच कारण महर्षि कर्वे ब्राह्मण ना ?

आता आमचं महर्षि कर्वेंशी काय भांडण बाबांनो ? पण तुमची पापं समोर आली कि तुम्ही आकांडतांडव करणार यात नवल ते काय ?

इतिहासात जायचं कि नाही ते एकदाच काय ते नीट सांगा. बघा ना त्या बाबरी मशीद - रामजन्मभूमी वादाने किती वर्षे देशाचे वातावरण बिघडलेले होते. जे मेले त्यांची जात पण बघा ना. एकही ब्राह्मण नाही हो त्यात. भडकवणा-या लेखण्या कुणाच्या होत्या त्यांची जात पहा मात्र नक्की..

आगरकर, टिळक ही नावं आम्हाला ही वंदनीय आहेत. पण रयतचं काम खेड्यापाड्यात घेऊन जाणा-या शिक्षणमहर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना ़आ विसरता बाबांनु ?
शिंदे, फुले ब्राह्मण नव्हते म्हणून का ?

सूर्याजी पिसाळच्या गद्दारीवर लिहीताना अफझलखानाच्या वकिलाचं नाव कुलकर्णी होता हे का दडवता बाबांनु ? प्रिम्टींग मिष्टेक म्हणायची का ?
तरी तुम्ही इनोसन्ट का ?
रामदास स्वामींबरोबर आमचं काय भांडण आहे का ? पण ते महाराष्ट्रात आले तेव्हा महाराज ४२ वर्षांचे होते. त्यानंतर ते फक्त आठच वर्षं जगले. मग स्वराज्याची प्रेरणा स्वामीजींनी महाराजांना बॅकडेटेड कशी काय दिली हे पण पाहणं मनोरंजक ठरेल ना ?
दादोजी कोंडदेव गुरू होते कि नव्हते हा वाद सोडवण्यासाठी शासनाने नेमलेल्या कमिटीत ब्राह्मण ईतिहासकारांनी काय पुरावे दिले ते समजलं तर या ब्रिगेडींना आम्ही जाब विचारू हो.. पण तुम्ही त्या कमिटीत असताना समकालीन पुरावे पाहून तुम्ही निरूत्तर झालात हे खरं ना ?
बोला पंत बोला..
हिंदुंवर अन्यायकारक मुघलांनी जिझिया कर बसवला असा ईतिहास आम्हाला शाळेत शिकवला जातो. पण या जिझिया करातून ब्राह्मणांना सूट होती हा भाग वगळला जातो. असं का बरं पंत ?
शिवाजीचं राज्य ते केव्हढंसं? चार जिल्हे पण नाहीत असं खाजगीत म्हणना-यांना पेशवाईचा किती अभिमान असतो हे का दडून राहीलय ? ते इतके शहाणे होते तर शिवाजी महाराजांना प्रेरणा ब्रिरणा देत बसण्यापेक्षा स्वतःच का नाही स्वराज्य स्थापन केलं असे प्रश्न आम्हाला पडतात. अटकेपार झेंडे नेले.. कबूल. पण मुघलांचा शेवटचा शक्तिशाली बादशहा औरंगजेब महाराष्ट्रात मुक्काम ठोकून बसला होता तो काय चार जिल्ह्याच्या राज्याचा धसका घेऊन. इथंच त्याने देह ठेवला आणि मग मुघल साम्राज्य लयास गेलं. बाकि सि़हाच्या जबड्यात हात घालण्याची सुरूवात केली म्हणूत तर स्वराज्य उभं राहीलं हे ज्यांना मान्य नाही ते काय काहीही बरळतील.
पण याच शिवाजी महाराजांचं नाव तुम्हाला राजकारणासाठी का वापरावं लागतं ? वापरा ना पेशव्यांच नाव. कोणी विरोध नाही करणार तुम्हाला..

Anonymous said...

@@@@ खेडेकर, साळुंखे महाराष्ट्राला मिळालेले शाप आहेत, ते काय लिहिणार? दळभद्री कुठले? इतकी वर्ष काय झोपले होते का? काही नाही हो, ब्राम्हण पुढे गेलेले झोंबतात यांना...पार्श्वभागात दम असेल तर बालासाहेबाना हात लावून दाखवा..तेही ब्राम्हणाच आहेत,




अबे बेवकूफ,ज्या लोकांचे नाव सांगतोस ते कुणाच्या नावावर आणि कुणाच्या जीवावर उड्या मारतात ते पण सांग कि..

Unknown said...

बाराशे वर्षापासून ब्राम्हणांना संपवायचा विषय चालू आहे ते अजूनही मजबूत आहेत ह्यांनी आणखी सात जन्म जरी घेतले तरी काही होणार नाही कारण काटेरी रस्त्यावरून अनवाणी चालायची सवय झाली आहे यांना राजमार्ग पाहिजे .दररोज कुठे न कुठे हे भूंकतच राहतात चिंता करू नका पुन्हा परशुराम अवतार घेईल

Unknown said...

संघ परपरीवारही तेवढाच घातक आहे

मिहीर said...

ब्राह्मण जात ही लवाळ्यासारखी आहे ! संभाजी ब्रिगेडचे कारस्थान कधीच पूर्ण होणार नाही, महापूरात मोठमोठे उन्नमत वृक्ष वाहून जातात. तिथे ह्या ब्रिगेडची काय बिशाद ?

मिहीर said...

ब्राह्मण जात ही लवाळ्यासारखी आहे ! संभाजी ब्रिगेडचे कारस्थान कधीच पूर्ण होणार नाही, महापूरात मोठमोठे उन्नमत वृक्ष वाहून जातात. तिथे ह्या ब्रिगेडची काय बिशाद ?

Unknown said...

बस चुकीचं बोलत आहे तुम्ही
तुम्ही ब्राम्हण लोकांनी किती पाप केलं आहे ते पण सांगा ना

Unknown said...

तुम्ही लोकांनी हा सर्व अंधश्रद्धा चा पूर्ण सिस्टम बनवून ठेवला आहे बामनांनी

Unknown said...

एकदम बरोबर भाऊ
चिमणराव मराठे नसते तर आज तुझ्या डोक्यावर शेंडी नाही तर तुझ्या चेहऱ्यावर मोठी दाढी असती

Unknown said...

ब्राम्हण जात ही संपूर्ण भारताला श्राप आहे

Unknown said...

"ब्रम्ह जानिती तोची *ब्राह्माण** ----समर्थ रामदास स्वामी.🙏 संदर्भ.पुराण.
ब्राह्माण ही जात नसून एक सर्वांगी सुंदर संप्रदाय जो देवांना सुधा आवडतो ...का? कारण प्रिय तो देवां चाही.
हे कलियुग आहे ज्यात शास्त्रात पुराणात वर्णन केले सत्यच आहे.100% त्याच प्रमाणे होईल उदा.1)कलयुगात देवांवर भक्ती कमी होईल प्रिय आप्रिय यात फरक करताच येणार नाहीं.ब्रह्माचाचं वरदान पावलेला*कलीची* महिमा आहे तो जीभ,लिंग, स्रीयोनी,मस्तक,सोने,दारु मद्यपान,वैशेच्ये कुणटन खाना,राजाचे सिंहासन,ई.ठिकाणी सदा वास करेल....तो ब्रह्मपुत्र आहे ...म्हणून का त्यालाही ब्राह्मणाचा मांन मिळतो....ज्याच्या त्याच्या वर आहे कोणास ब्राह्माण पूजा पाठ वाला हवा ,कुणास जादूटोणा वाला पुजारी....हे जरी सत्त्या आसले तरी धर्मशील, ज्ञानी च श्रेष्ठ ...जारी तो ब्राह्मण नसेल तरी...हेच शास्त्र आहे.....जन्माने कोनिदेव नसतो जो तो त्याच्या कर्माने मोठा होतो...म्हणून कर्म चांगले ठेवावे.....राहिला ह्या ब्राह्मणांना शिव्या घालणाऱ्या काही स्वतःस महान ठरवणाऱ्यांनी स्वतः स्वतःकडे लक्ष द्यावे...उगीच ब्रमात राहणे मूर्ख म्हटले जातात...आश्याना ही देव देतोच ना...म्हणून देवावर श्रद्धा असणे महत्वाचे न की हे मनुवादी जातीयवादी भाषण .....सत्य परेशान होता हे पराजित नहीं....भगवान परशुराम चिरंजीवी आहे....त्यांनासुद्धा याची कलयुगात...पूर्ण कल्पना आहे..ही नियती आहे...कलंकी अवतार होणार आहे...हे 100% सत्य...तोच आश्यांना व सोबत जातीचा पगडा असणाऱ्यांना शासन करेलच शंकाच नाही.....मी पुन्हा एकदा बोलू इच्छितो..खोट्या जतीपतीत न आडकतादेव धार्मिक सुज्ञ चित्वापन...सारस्वत, देशस्य, कोकणी, ई.न आडक्ता ..शाकाहारी जिज्ञासूंना ब्राह्माण होत आसेल तर्र त्याची स्वखुशीने ..आपल्या ब्राह्मण.धर्मात स्वागत कल्यास फायदाच होईल...खऱ्या सत्य कर्म विश्वास ठेवावा.....🙏जय परशुराम🙏. जातीचा गर्व आसवा..आणि हो मी जेवढा आभतास केलाय त्या नुसार ही योग्यता फक्त व फक्त ब्राह्मणांनाच..1000% सत्य..त्यात कोणास वाईट वाटण सारखे काहीच नाही ....जे नाव ठेवतात दुर्लक्ष करावे...पोलिस कंप्लेंट करावी नाकी वाद; नाही विवाद ..🙏🙇🙏....

Unknown said...

शास्त्र प्रमाणे...कोणास स्वतःहून ब्राह्मण समाजात यायचे आसेल तर्र त्याची नोंद व विधी शासनचीच जबदरी मानवी.... ब्राह्मण
जात वडते आहे तर्र वाढू द्याना ...आपलाच.. दिपक श्रीखंडे.(पूर्वाश्रमीचा आपलाच बंधू..)🙏🙇🙇 जय परशुराम🙇🙇 जय भगवान विश्वनाथ🙇

Unknown said...

Mast joke hota ha

Abhijeetsgalaxy said...

ह्या सर्व चिडीतुण कुळकायदा काढला आणि ब्राह्मणांना उघडे पाडण्याचा कट रचला

आगंतुक said...

Lata mangeshkar is saraswat brahmin